पिंपळखुटा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 08:10 PM2017-08-01T20:10:58+5:302017-08-01T20:11:53+5:30

खेट्री : नजीकच्या पिंपळखुटा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची बाब १ आॅगस्ट रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून, गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Five house buffalo at Pimpalkhuta at one night | पिंपळखुटा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या

पिंपळखुटा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या

Next
ठळक मुद्देएकूण ४१,५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाचान्नी पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच!गावात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : नजीकच्या पिंपळखुटा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची बाब १ आॅगस्ट रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून, गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळखुटा येथील परशराम वावकार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख ४५ हजार रुपये व ५,९०० रुपये किमतीची सोन्याची पोथ, डिगांबर झाळोकार यांच्या घरातून रोख ५,३०० रुपये व सोन्याच्या दागिन्यांसह २०,५०० रुपयांचा मुद्देमाल, शेख आमद यांच्या घरातून रोख दोन हजार रुपये, श्रीराम झाळोकार यांच्या घरातून रोख ५,१५० रुपये, गणेश दांदळे यांच्या घरातून रोख नऊ हजार रुपये व सोन्याचे दागिने, असे एकूण ४१,५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेबाबत माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याबाबत परशराम वावकार व इतर चार जणांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या ४५७ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.

परिसरात चोरणारी टोळी सक्रिय
दोन आठवड्यापूर्वी चतारी येथे पाच घरफोड्या, सायवणी येथील तीन घरांमध्ये लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी शिरपूर येथील व्यायाम शाळेतील लाखो रुपयांचे साहित्य, चतारी येथील रोहित्र फोडून तार व आॅइल, शेतातील कृषी पंप व साहित्य, तुलंगा येथील एका घरातील रोख रक्कम व आलेगाव येथील कृषीपंप व शेती साहित्य अज्ञात चोरट्यांच्या टोळीने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पोलिसांची गस्त कागदोपत्रीच!
परिसरात चान्नी पोलिसांकडून अद्यापही गस्त घालण्यात येत नाही. गस्त फक्त कागदोपत्रीच केली जात असल्यामुळे परिसरात चोºयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरट्यांवर पोलिसांचा अजिबातच वचक राहिलेला नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर बाबीची दखल घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Five house buffalo at Pimpalkhuta at one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.