पाच किलो गांजासह एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:03 AM2017-08-07T03:03:47+5:302017-08-07T03:03:51+5:30
वाशिमच्या आययूडीपी परिसरातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी घेऊन जात असणाºया करण मोहन जाधव (रा.हनवतखेडा, ता.मालेगाव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पाच किलो गांजासह रविवारी अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव हा आययूडीपी कॉलनी येथे मुक्कामी असून, आपल्यासोबत ५ किलो ४०० गॅ्रॅम वजनाचा गांजा (किंमत ८१ हजार) बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने लक्ष ठेवून आज, ७ आॅगस्ट रोजी सापळा रचून आरोपीस अटक करण्यात यश मिळविले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील डुकरे यांच्या नेतृत्वातील या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाडवे, पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप चव्हाण, नायक पोलीस सुनील चव्हाण, राहुल व्यवहारे, रामकृष्ण नागरे, पोलीस शिपाई राजेश राठोड, स्वप्निल शेळके, रवी घरत, चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक थोरवे यांचा समावेश होता. आरोपी करण जाधवविरुद्ध मादक द्रव्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवैधरीत्या गांजाजवळ बाळगणे व त्याची विक्री करण्याचे रॅकेट सक्रिय असून, या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध वाशिम पोलीस घेत आहेत.