अकोला ‘एमआयडीसी’तील गोदामातून पाच लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:56 PM2019-01-11T13:56:21+5:302019-01-11T13:56:49+5:30
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा ठेवला असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकू न तब्बल पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा ठेवला असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकू न तब्बल पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
एमआयडीसीतील एका गोदामात वाहीद नामक व्यक्तीचा गुटखा असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सदर गोदामावर छापा टाकून पाच लाख रुपयांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला. त्यानंतर गुटख्याच्या मालकाचा शोध घेण्यात आला असून, त्यास समजपत्र देऊन सोडण्यात आले. गुटखा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्यानंतर त्यांनी सुटीवर असल्याचे कारण समोर करून या ठिकाणी येण्याचे टाळल्याचे स्पष्ट दिसून आले. यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची गुटखा माफियांसोबत असलेले साटेलोटे उघड झाले. याप्रकरणी गुटखा माफियाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अळसपुरे यांनी दिली. ही कारवाई विशेष पथकाने केली.
---------------------------------
‘एफडीए’ची टाळाटाळ
गुटखा जप्त केल्याची माहिती विशेष पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांना दिल्यानंतर त्यांनी सुटीवर असल्याचे कारण सांगून घटनास्थळावर येण्याचे टाळले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाºयांचे गुटखा माफियांशी आर्थिक कनेक्शन असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. याच कनेक्शनच्या मिठाला जागत त्यांनी कारवाई करण्यासाठी माघार घेतल्याचे बोलल्या जात आहे.
जुन्या बाटलीत नवी दारू
गुटख्याच्या मोठमोठ्या कंपन्यांकडून गुटखा माफियांमध्ये स्पर्धा लावण्यात आल्याची माहिती आहे. याच स्पर्धेतून हद्दपार झालेले काही जुने गुटखा माफिया आता पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा डाव साधत असल्याची माहिती आहे. यामध्ये नरेश अन् नीलेश या दोन जुन्या गुटखा माफियांनी पुन्हा मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामधील एक गुटखा माफिया पोलिसांचाच खबºया असल्याचे त्याचा गुटखा व्यवसाय मोठा तेजीत असून, त्याला पोलिसांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे.
खामगावात बडा माफिया
खामगावात गुटख्याचा मोठा माफिया असून, त्याचेच चट्टे-बट्टे अकोल्यात हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालवित असल्याची माहिती आहे. यामध्ये जुन्या किराणा बाजारातील काही छोटे-मोठे गुटखा माफिया प्रचंड फोफावले असून, त्यांच्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.