राज्यात आणखी पाच शेतक-‍यांच्या आत्महत्या

By admin | Published: April 3, 2015 02:36 AM2015-04-03T02:36:52+5:302015-04-03T02:36:52+5:30

पश्‍चिम वर्‍हाडातील दोन शेतक-‍यांसह एका शेतमजुराने संपवली जीवनयात्रा.

Five more farmers suicides in the state | राज्यात आणखी पाच शेतक-‍यांच्या आत्महत्या

राज्यात आणखी पाच शेतक-‍यांच्या आत्महत्या

Next

अकोला : दोन शेतकर्‍यांसह एका शेतमजुराने आत्महत्याच्या केल्याच्या घटना पश्‍चिम वर्‍हाडात गुरूवारी घडल्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जिवनयात्रा संपविणार्‍या या शेतकर्‍यांमध्ये एक वाशिम जिल्ह्यातील, तर दोघे बुलडाणा जिल्ह्यातील आहेतवर्धेतील दोन आणि नगरमधील एकाचा समावेश आहे..
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ खुर्द येथील अंबादास पांडुरंग निर्मळ (वय ४५) हे २९ मार्च रोजी शेगाव येथे जात असल्याचे सांगून घरून निघून गेले होते. ३0 मार्च रोजी त्यांनी शेगाव परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. निर्मळ यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्याकडे पतसंस्थेचे कर्ज थकीत होते. नापिकी आणि कर्जामुळे ते आर्थिक विंवचनेत होते.
दुसर्‍या एका घटनेत, वाशिम जिल्ह्यातील येवता बंदी येथील एका ५५ वर्षिय शेतकर्‍याने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततचे आजारपण आणि नापिकीला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. अरुण लक्ष्मण बोनके हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील शेतमजूर गणपत संपत लाहुडकर (वय ५५) यांनी गुरूवारी आत्महत्या केली. ते शेती ठोक्याने घेवून करीत होते. यावर्षी शेतीत लावलेला खर्चसुध्दा निघणे कठीण झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतमजुराने हिंगणा शिवारातील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.



 

Web Title: Five more farmers suicides in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.