अकोल्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, ४९५ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:00 PM2021-04-18T18:00:07+5:302021-04-18T18:00:38+5:30

Corona Cases in Akola : आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींचा आकडा ५६० झाला आहे.

Five more killed in Akola, 495 corona positive | अकोल्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, ४९५ कोरोना पॉझिटिव्ह

अकोल्यात आणखी पाच जणांचा मृत्यू, ४९५ कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, १८ एप्रिल रोजी आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींचा आकडा ५६० झाला आहे. गत २४ तासांत आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३०३ व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये १९२ अशा ४९५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ३३,७७० वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,७०३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,४०० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापुर तालुक्यातील सहा, अकोट तालुक्यातील ६४, बाळापूर तालुक्यातील १८, तेल्हारा तालुक्यातील १९, बार्शी टाकळी तालुक्यातील चार, पातूर तालुक्यातील १६, अकोला ग्रामीण २३ व अकोला मनपा क्षेत्रातील १५३ रुग्णांचा समावेश आहे.

येथील पाच जणांचा मृत्यू

  • वरखेड (ता. बार्शीटाकळी) येथील ७० वर्षीय पुरुष
  • सेलगाव (ता. पातूर येथील) ६५ वर्षीय पुरुष
  • आंबोडा (ता. अकोट) येथील ८० वर्षीय पुरुष
  • मलकापूर येथील ७० वर्षीय पुरुष
  • देगाव (ता.बाळापूर) येथील ७२ वर्षीय पुरुष

 

रॅपिड चाचण्यांमध्ये १९२ पॉझिटिव्ह

शनिवारी दिवसभरात १६०९ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १९२ पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात ९२,२२९ चाचण्या झाल्या. त्यामध्ये पैकी ७१६० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

४,७९९ रुग्ण उपचाराधिन

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३,७७०  जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २८,४११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५६० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,७९९ रुग्ण उपचाराधिन आहेत.

Web Title: Five more killed in Akola, 495 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.