जीआरपीच्या ठाणेदारासह पाचही पोलिसांना जामीन

By Admin | Published: August 6, 2016 01:53 AM2016-08-06T01:53:30+5:302016-08-06T01:53:30+5:30

लाचखोर पोलीस कर्मचा-यांचा जामीन मंजूर; फेरीवाल्याकडून केली जात होती हप्ता वसूली.

Five policemen, including GRP's Thanedar, will be arrested | जीआरपीच्या ठाणेदारासह पाचही पोलिसांना जामीन

जीआरपीच्या ठाणेदारासह पाचही पोलिसांना जामीन

googlenewsNext

अकोला, दि. ५: अकोला जीआरपीचे ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे आणि गुन्हे शाखेच्या चार लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. त्यानंतर पाचही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्याने पाचही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
रेल्वे स्टेशन परिसरात तसेच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या फेरीवाल्यास खाद्यपदार्थांंची विक्री करावयाची असेल तर दर महिन्याला साडेसहा हजार रुपयांचा ह्यहप्ताह्ण अकोला जीआरपीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे, जीआरपी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गौतम हरिभाऊ शिरसाट, शरद बाळाभाऊ जुनघरे, सतीश जसवंतसिंह चव्हाण आणि सुनील लक्ष्मण कडू यांनी मागितला होता. साडेसहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्यावरून या पाचही जणांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी पोलीस कोठडी संपल्याने या पाचही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर पाचही आरोपींनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात अर्ज केला. शुक्रवारी पाचही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Five policemen, including GRP's Thanedar, will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.