जिल्ह्यात पाच जण दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:39+5:302021-02-24T04:20:39+5:30
ॲन्टीबॉडी किती महिन्यांपर्यंत प्रभाव? कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये हळूहळू ॲन्टी बॉडीज तयार होतात. या ॲन्टीबॉडीज कोविड विषाणूनांविरुद्ध लढतात. वैद्यकीय ...
ॲन्टीबॉडी किती महिन्यांपर्यंत प्रभाव?
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये हळूहळू ॲन्टी बॉडीज तयार होतात. या ॲन्टीबॉडीज कोविड विषाणूनांविरुद्ध लढतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते या ॲन्टी बॉडीज साधारणत: तीन महिने प्रभावी ठरतात. त्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होऊ लागतो.
मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय
कोरोनावर अजुनतरी प्रभावी औषध निर्माण झाले नाही. त्यामुळे त्यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच प्रभावी साधन आहे. त्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच प्रभावी उपाय आहे.
बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे आवश्यक आहे. मास्कमुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होतोच, शिवाय धुळीपासूनही संरक्षण होते. गत वर्षभरात याचे अनेकांना सकारात्मक अनुभव आल्याचे दिसून येते.
कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर, नियमीत स्वच्छ हात धुणे तसेच इतरांपासून सुरक्षीत अंतर ठेवणे या त्रीसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते. परंतु, अनेक जण त्याचे पालन करत नाही.
जिल्ह्यात दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या खुप कमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत केवळ पाच जण दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह असलेले दाखल झाले आहेत. मात्र, पोस्ट कोविड वॉर्डात तपासणीसाठी आलेल्या काही रुग्णांना फायब्रोसिसशी निगडीत लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कोरोनातून बरे झाल्यावर त्रास होत असल्यास रुग्णांनी सर्वोपचार रुग्णालयातील पोस्ट कोविड वॉर्डात येवून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी,अकोला