पॉलीटेक्नीक कॉलेजमधील पाच प्राध्यापकांनी केला विद्यार्थीनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:35 PM2018-11-24T17:35:11+5:302018-11-24T17:35:59+5:30
मुर्तीजापूर (अकोला ) : मुर्तीजापूर येथील डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलीटेक्नीक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीचा पेपर सुरु असतांना कॉपी असल्याच्या संशयावरुन या विद्यार्थीनीची महाविद्यालयातील पाच प्राध्यापकांनी शारीरीक तपासणी केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला
मुर्तीजापूर (अकोला ) : मुर्तीजापूर येथील डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलीटेक्नीक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीचा पेपर सुरु असताना कॉपी असल्याच्या संशयावरुन या विद्यार्थीनीची महाविद्यालयातील पाच प्राध्यापकांनी शारीरीक तपासणी केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला. विद्यार्थीनीने शारीरीक तपासणी महिला प्राध्यापकाकडून करण्याची विनंती केली मात्र पाच प्राध्यापकांनी काहीही न ऐकता या विद्यार्थीनीला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारची वागणुक दिल्याने मुर्तीजापूर ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मूर्तिजापूर - कारंजा रोडवरील तुरखेड येथील डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलीटेक्नीक महाविद्यालयात इलेक्ट्रॉनीक्स आणि टेलीकम्यूनीकेशचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या एका विद्यार्थीनीचा तृतीय वर्षाचा पीडीटी या विषयाचा पेपर सोमवार १९ नोव्हेंबर रोजी सुरु होता. सदर विद्यार्थीनी पेपर लिहिण्यात व्यस्त असताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुफले, प्रा. गोलार, प्रा. घाटोळे, प्रा. सरदार, प्रा. सातिंगे यांनी विद्यार्थीनीच्या पाठीमागे व जवळ कॉपी असल्याच्या संशयावरून विद्याथीर्नीची झडती घेण्यास सुरुवात केली. या विद्यार्थीनीच्या नको त्याठिकाणी स्पर्श करण्यात येत असल्याने विद्यार्थीनीने महिला प्राध्यापक कींवा अन्य महिला कर्मचाऱ्यांकडून शारीरीक तपासणी करण्याची विनंती प्राध्यापक व प्राचार्यांना केली. मात्र प्राचार्य व प्राध्यापक ांनी तीचे म्हणणे ऐकून न घेता तीच्या ड्रेसमध्ये कॉपी असल्याचा गवगवा करीत अंगझडती घेतली. पाचही प्राध्यापकांनी अंगझडती घेतल्यानंतर तीच्याकडे कॉपी न मिळाल्याने प्राध्यापकांचा हीरमोड झाला. त्यामूळे या गंभीर प्रकरणाची तक्रार विद्यार्थीनीने मुर्तीजापूर ग्रामिण पोलिस ठाण्यात केल्यानंतर ठाणेदार नितीन पाटील यांनी कर्मचाºयांसह तपासणी करून प्रभारी प्राचार्य सुफले, प्रा. गोलार, प्रा. घाटोळे, प्रा. सरदार, प्रा. सातिंगे यांच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
युवतीने बलात्काराची तक्रार केल्यानंतर छळ
डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलीटेक्नीक महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना सदर विद्यार्थीनीचा कांबे यांचा मुलगा संकेत कांबे याने लैंगीक छळ केला होता. या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सदर विद्यार्थीनी केवळ शिक्षण पुर्ण करण्यासाठी पेपर देण्यासाठी महाविद्यालयात गेली असता तीचा प्राध्यापकांकडून छळ करण्यात येत असल्याचे तीचे म्हणणे आहे. तर या प्रकारामागे डॉ. राजेश कांबे व त्यांचा मुलगा संकेत कांबे यांचेच डोके असून त्यांच्यावही फौजदारी कारवाईची मागणी विद्यार्थीनीने तक्रारीव्दारे केली आहे.