बार्शीटाकळी शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 02:06 PM2018-12-23T14:06:58+5:302018-12-23T14:07:03+5:30
बार्शीटाकळी: शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक नागरिकांना स्वस्त धान्य वाटप योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. गत काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारक नागरिक धान्यापासून वंचित आहेत.
बार्शीटाकळी: शहरातील पाच हजार नवीन शिधापत्रिकाधारक नागरिकांना स्वस्त धान्य वाटप योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. गत काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारक नागरिक धान्यापासून वंचित आहेत.
बार्शीटाकळी शहरामध्ये १२७0 केशरी कार्डधारक आहेत. यातील शेकडो शिधापत्रिकाधारक हे भूमिहीन व दुर्बल घटकातील आहेत. त्यांना स्वस्त धान्याची गरज असतानाही पुरवठा विभागाकडून त्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात अनेक नागरिकांनी कार्ड असूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या; परंतु या तक्रारीची दखलही पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. अन्नसुरक्षा योजनेमधून भूमिहीन व दुर्बल घटकातील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन २0 डिसेंबर रोजी तहसीलदार रवी काळे यांना बार्शीटाकळी नगरपंचायतचे अध्यक्ष महेफुज खान यांनी दिले. निवेदनामध्ये शिधापत्रिकाधारक नागरिकांना धान्यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करू नये, त्यांना तातडीने धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही नगरपंचायतचे अध्यक्ष महेफुज खान यांनी केली आहे. त्यावेळी भारत बोबडे, अन्सार खान, दत्ता साबळे, बबलू काजी, अब्दुल अकील, सुदेश जामनिक, श्रावण भातखड, गुड्डूभाई, मोहम्मद शोएब, अर्शद खान, रोशन शहा, मोहम्मद सादिक व अॅड. विनोद राठोड उपस्थित होते. (प्रतिनिधी)