शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:38 PM2018-12-23T12:38:42+5:302018-12-23T12:38:51+5:30

अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Five thousand rupees per month 'Pensions' for farmers! - Kishor Tiwari | शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

googlenewsNext

 - संतोष येलकर
अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
देशातील शेतकºयांना दरमहा पेन्शन देण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये केले होते; मात्र केंद्र सरकारकडून अद्याप शेतकºयांना पेन्शन लागू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सर्व शेतकºयांना कोणतीही अट न लावता दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू करून, दिलासा दिला पाहिजे. यासंदर्भात आपण दोन दिवसांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे शेतकºयांना पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

विनाअट लागवडीचे अनुदान द्यावे!
सरकारने राज्यातील सर्व शेतकºयांना पीक लागवडीचे अनुदान दिले पाहिजे. गरीब-श्रीमंत असा भेद न करता तसेच जमीन क्षेत्राची कोणतीही अट न लावता सर्व शेतकºयांना विनाअट लागवडीचे अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणार असल्याचे किशोर तिवारी म्हणाले.

बीपीएल-एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य द्या!
राज्यातील सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय योजनेंतर्गत आणि सर्व एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्याचा लाभ दिला पाहिजे, त्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Five thousand rupees per month 'Pensions' for farmers! - Kishor Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.