उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर, बाॅयपॅप मशीन उपलब्ध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:31+5:302021-05-26T04:19:31+5:30
स्थानिक आमदारांनी मंगळवारी मशीनची पाहणी करून संबंधितांना मशीन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाढीव कोविड बेडकरिता प्रगतिपथावर सुरू असलेल्या ...
स्थानिक आमदारांनी मंगळवारी मशीनची पाहणी करून संबंधितांना मशीन कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच वाढीव कोविड बेडकरिता प्रगतिपथावर सुरू असलेल्या सेंट्रल ओटू (ऑक्सिजन) पाइपलाइन कामाची पाहणी केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विलास सोनोने, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, नगरसेवक सचिन देशमुख, सुरेश तायडे, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, डाॅ. नेमाडे, डाॅ. यदवर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू मुळे, अली, कमलाकर गावंडे, भाजपा शहर उपाध्यक्ष कोमल तायडे, सुनील लशुवानी, गजानन नाकट, संदीप जळमकर, अनिल अग्रवाल, राजेंद्र इंगोले, बबलू ढोक, सुरेश तायडे, जयंत वानखडे, गोडाले, विशाल गुप्ता आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : हॉस्पिटल नावाने
रुग्णांना मिळणार दिलासा
येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि बॉयपॅप मशीनची अत्यंत गरज होती. तशी रुग्णालयाकडून प्रशासनाकडे मागणी करण्यात आली हाेती. स्थानिक आमदारांनी यासाठी पुढाकार घेऊन, रुग्णालयाला व्हेंटिलेटर व बॉयपॅप मशीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.