गावागावांत वाहतोय हातभट्टीचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:57+5:302021-05-27T04:20:57+5:30

अकोट: कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारू दुकाने बंद आहेत. परिणामी, मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू ...

Flood of hand kilns flowing in villages | गावागावांत वाहतोय हातभट्टीचा महापूर

गावागावांत वाहतोय हातभट्टीचा महापूर

Next

अकोट: कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारू दुकाने बंद आहेत. परिणामी, मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जात असून, प्रत्येक गावात ही दारू सहज उपलब्ध होत आहे.

--------------------------

भाजीबाजारात गर्दी; धोका वाढला!

वाडेगाव: येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. रविवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भाजीबाजार भरला. मात्र, या ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. ग्राहकही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत.

----------------------------

काजळेश्वर येथील एकाचा मृत्यू

बार्शिटाकळी: तालुक्यात काजळेश्वर येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, तरीही नागरिक बिनधास्त नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

---------------------

पातूर तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक

पातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत, पातूर तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

--------------------------

बाळापूर तालुक्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह!

बाळापूर: तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, नागरिकांची चिंता वाढली आहे. बुधवार, दि. २६ मे रोजी प्राप्त अहवालानुसार, आणखी २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------------------------

बाळापूर तालुक्यात भुईमूग काढणीस प्रारंभ

बाळापूर: तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमुगाचा पेरा वाढलेला असून, सद्यस्थितीत भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू असून, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

------------------------------------------

प्रवासी निवाऱ्यात वाढले अतिक्रमण

अकोला : उगवाफाटा येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनला असून, प्रवासी निवाऱ्यात अतिक्रमण वाढले आहे. बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्यामुळे नवथळ, पाळोदी येथील प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Flood of hand kilns flowing in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.