साचलेले पाणी वाहते करा, डेंग्यू, मलेरियाचा धोका टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:50 PM2017-10-15T19:50:58+5:302017-10-15T19:51:36+5:30

अकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा  आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे.  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे.

Flood water flows, avoid dengue, malaria risk! | साचलेले पाणी वाहते करा, डेंग्यू, मलेरियाचा धोका टाळा!

साचलेले पाणी वाहते करा, डेंग्यू, मलेरियाचा धोका टाळा!

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन कीटकजन्य आजार टाळण्यासाठी दक्षता गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा  आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे.  ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. यामुळे कीटकजन्य  आजार वाढीस लागले असून, घराघरांमध्ये तापाचे रुग्ण  आढळून येत आहेत. तुंबलेल्या नाल्या व टाकाऊ वस्तू व  खड्डय़ांमध्ये साचलेले पावसाचे पाणी वाहते करून प्रत्येकाने  कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य  आजारांना आळा घालणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता  बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले  आहे.
घराच्या छतावरील रिकाम्या भांड्यामध्ये तसेच घराच्या आवारा त कुठेही पावसाचे पाणी साचल्यास त्यामध्ये डासांची पैदास होते.  एडीस एजिप्टा, अँनोफिलीस यासारख्या डासांनी चावा घेतल्यास  मनुष्याला डेंग्यू, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता  असते. सध्या डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होत असल्याने  त्यांची घनता वाढली आहे. परिणामी, जिल्हय़ात कीटकजन्य  आजाराचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात  स्वच्छता ठेवली व कोरडा दिवस पाळल्यास या कीटकजन्य  आजारांना दूर ठेवता येणे शक्य आहे. यासाठी नागरिकांनी  पावसाचे साचलेले पाणी वाहते करून परिसर स्वच्छ ठेवावा,  असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

खबरदारीचे उपाय
शहर, गावांमधील नाल्यांचे पाणी वाहते करणे.
साचलेल्या पाण्यात रॉकेल अथवा ऑइल टाकावे.
गळती लागलेल्या जलवाहिनींची दुरुस्ती करावी.
घराच्या छतावरील रिकामी भांडी, टायरमध्ये पाणी साठू न देणे.
तलाव, नद्यांमध्ये जलकुंभी आदी वनस्पतींची वाढ न होऊ देणे.
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे.
ताप, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे दिसून आल्यास आरोग्य  केंद्राला भेट द्यावी.
 

Web Title: Flood water flows, avoid dengue, malaria risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य