काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 05:22 PM2021-07-22T17:22:46+5:302021-07-22T17:22:52+5:30

Katepurna River Flood : पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Flooding of Katepurna river; Hundreds of acres of farmland under water | काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली

काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली

googlenewsNext

मूर्तिजापूर : काटेपूर्णा नदीला गुरुवारी सकाळी ८ वाजता आलेल्या अचानक पुरामुळे नदी काठावरील गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
       तालुका वगळता इतरत्र जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे काटेपूर्णा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहे. सदर पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे परंतु तालुक्यातील नद्या मात्र दुथडी भरून वाहत आहेत तालुक्यातुन वाहत जात असलेल्या काटेपूर्णा व पुर्णा या दोन मोठ्या नद्या आहेत, दोन्ही नद्या दुथडी वाहत असून काटेपूर्णा नदीला गुरुवारी सकाळी अचानक पुर आला. तालुक्यात भरपूर पाऊस नझाल्याने नदी काठावरील गावातील नागरीक गाफील राहीले, परंतु सकाळी एकाएकी पुर आल्याने समशेरपूर, गोरेगाव, गाजीपुर, सालतवडा, अटकळी, जांभा, दताळा, भटोरी, शेलू बोंडे, मंगरुळ कांबे. आदी नदीकाठावरील गावातील शेत जमीन पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर मूर्तिजापूर - म्हैसांग - अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या नदीच्या विळख्यात येत असलेल्या काही गावाचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.


सकाळी आठवाजता काटेपूर्णा नदीला अचानक पुर आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, काही भागातील गावांचा संपर्क तुटला असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
-प्रवीण खोत, सरपंच समशेरपूर

Web Title: Flooding of Katepurna river; Hundreds of acres of farmland under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.