विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओघ; जागांपेक्षा अर्ज दुप्पट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:23 AM2021-08-25T04:23:48+5:302021-08-25T04:23:48+5:30
आयटीआय प्रवेशासाठी आता स्पर्धा वाढत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २ हजार ६९६ हजार जागा आहेत. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस अधिकृत ...
आयटीआय प्रवेशासाठी आता स्पर्धा वाढत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २ हजार ६९६ हजार जागा आहेत. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस अधिकृत सुरुवात झाली आहे. १९ ऑगस्टपर्यंत ६ हजार ९६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. ३१ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. गत काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात आयटीआय झालेल्या युवकांना मोठी मागणी आहे. तशा संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.
अर्ज स्थिती
एकूण जागा २७९६
आलेले अर्ज ६९६५
जिल्ह्यातील आयटीआय
शासकीय ८
खासगी २
प्रवेश क्षमता
शासकीय जागा २६१६
खासगी जागा १८०
या कारणांमुळे चांगला प्रतिसाद
अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कंपन्या आयटीआय विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी देत आहेत.
अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागेवरच रोजगार मिळतो.
त्यामुळे विद्यार्थी आयटीआयला अधिक पसंती देत आहेत. अकोला जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ८ असून, खासगी संस्था २ आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
दहावी, बारावीनंतर लगेच रोजगाराची संधी मिळविण्यासाठी आयटीआय ही एकमेव संस्था आहे. यामाध्यमातून रोजगारासोबत स्वयंरोजगारही करता येऊ शकतो. कंपनीमध्ये नोकरीसाठी आवश्यक आहे.
- विपुल इंगळे
शिक्षणानंतर लवकर नोकरीची संधी हवी आहे. स्वयंरोजगारही करावयाचा असल्यास आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा अर्ज केला असून दहावीतही चांगले गुण मिळाले आहे.
- राजेश निकाळजे
म्हणून वाढले आयटीआयचे विद्यार्थी
आयटीआयमध्ये व्यावसायिक कौशल्यावर अधिक भर दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळते. तसेच स्वयंरोजगारही मिळविणे शक्य होते. आयटीआयमुळे रोजगाराच्या संधीही वाढल्या आहे. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
- प्रकाश जयस्वाल, प्राचार्य
कौशल्यासाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण मिळतो. मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआयचे ट्रेड महत्त्वाचे आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगारही मिळविता येऊ शकतो. विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीही मिळविता येते.
- राम मुळे, प्राचार्य