‘फुलावरचे फुलपाखरू’ राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:30+5:302021-02-05T06:11:30+5:30

या कार्यक्रमास रोटरी जिल्हा जिल्हा सचिव टॉबी भागवागर, रोटे. जमुना शाकीर, रोटरी जिल्हा क्लब अकोलाचे अध्यक्ष सीए घनश्याम चांडक, ...

‘Flower Butterfly’ State Level Photography Competition | ‘फुलावरचे फुलपाखरू’ राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा

‘फुलावरचे फुलपाखरू’ राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा

Next

या कार्यक्रमास रोटरी जिल्हा जिल्हा सचिव टॉबी भागवागर, रोटे. जमुना शाकीर, रोटरी जिल्हा क्लब अकोलाचे अध्यक्ष सीए घनश्याम चांडक, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष प्रकाश सारडा, रोटरी क्लब अकोटचे अध्यक्ष शिरीष पोटे, उपप्रांतपाल अतुल चौधरी, रोटरी क्लबचे पूर्व अध्यक्ष व ईएफईसीचे उदय वझे, सचिव प्रेमकिशोर चांडक व संदेश रांदड, रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन केले. उदय वझे यांनी पर्यावरण संवर्धन व फुले व फुलपाखरे यांचा सहसंबंध आणि स्पर्धेचे नियम उद्धृत केले. आभारप्रदर्शन रोटे. श्रीकांत पडगिलवार यांनी केले. सेक्रेटरीयल घोषणा प्रेमकिशोर चांडक यांनी केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या स्पर्धेच्या माध्यमातून फुले व फुलपाखरे यांच्या सहसंबंधाची माहिती होईल व निसर्ग संवर्धनाची चळवळ उभी राहील. हौशी वा व्यावसायिक फोटोग्राफर किंवा फोटोग्राफीची आवड असणाऱ्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची ही सुवर्णसंधी आहे. सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असून, या स्पर्धेत पूर्वी काढलेला किंवा मुद्दाम या स्पर्धेसाठी काढलेला फुलावर असलेल्या किंवा फुलामधून मकरंद प्राशन करताना फुलपाखरांचा फोटोग्राफ पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे

Web Title: ‘Flower Butterfly’ State Level Photography Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.