रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये फुलविले कमळ!
By admin | Published: July 19, 2016 01:51 AM2016-07-19T01:51:44+5:302016-07-19T01:51:44+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी अकोला शहरात अभिनव आंदोलन करून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांकडे वेधले लक्ष.
अकोला : गल्लीपासून दिल्लीपर्यंंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही नागरिकांना अजूनही अच्छे दिन आले नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी अकोला शहरात अभिनव आंदोलन करण्यात आले. शहरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांंनी खड्डय़ांमध्ये साचलेल्या पाण्यात भाजपचे चिन्ह असलेले कमळ फुलविले. शहरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकार नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असून, सर्व जन ह्यमिल बाटके खायेंगेह्णच्या वृत्तीत असल्याचा आरोप करीत मनसे महानगर अध्यक्ष सौरभ भगत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भाजपने दिलेल्या अच्छे दिन, सबका विकास, मेक इन इंडिया आदी आश्वासनांचा निषेध म्हणून यावेळी मनसे कार्यकर्त्यांंनी नागरिकांना चॉकलेट वाटले. शासन व लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची दखल घेऊन योग्य पावले न उचलल्यास आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी भगत यांनी दिला. याप्रसंगी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले, जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, मनसे माजी नगरसेवक पंकज साबळे, महानगर उपाध्यक्ष सचिन गव्हाळे, राजेश पिंजरकर, राकेश शर्मा, चंदू अग्रवाल, अमर बेलखेडे, संतोष नंदाने, सतीश फाले, सतीश वानरे, सचिन बोंद्रे, ललीत यावलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.