सप्टेंबरनंतर रुग्णसंख्या वाढीत चढ-उतार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:20+5:302020-12-07T04:13:20+5:30

जिल्ह्यात मे महिन्यापासून कोरोनाचा कहर वाढत गेला असून, मृत्यूचा दरही वाढत गेला. जून, जुलै महिन्यात विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्या ...

Fluctuations in patient growth after September! | सप्टेंबरनंतर रुग्णसंख्या वाढीत चढ-उतार!

सप्टेंबरनंतर रुग्णसंख्या वाढीत चढ-उतार!

Next

जिल्ह्यात मे महिन्यापासून कोरोनाचा कहर वाढत गेला असून, मृत्यूचा दरही वाढत गेला. जून, जुलै महिन्यात विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढीचा वेग अकोला जिल्ह्याचा नोंदविल्या गेला. शिवाय, मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढू लागला होता. विदर्भात सर्वाधिक ३.४ टक्क्यांचा मृत्यूदर अकोला जिल्ह्याचा होता. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढली होती. सप्टेंबर महिन्यात मात्र कोरोनाने थैमान घातले हाेते. हा महिना अकोलेकरांसाठी घातक ठरला होता. महिनाभरात ३,४६८ रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर ८४ जणांचा बळी गेला होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या वाढीसह मृत्यूलाही ब्रेक लागला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढला असून, दिवाळीनंतर झपाट्याने रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णसंख्या वाढ होत असली, तरी मृत्यूचा आलेक घसरता असून, अकोलेकरांना या बाबतीत दिलासा मिळाला आहे.

सर्वात कमी मृत्यू नोव्हेंबरमध्ये

नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली असली, तरी मृत्यूला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. महिनाभरात १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, हा आकडा गत सहा महिन्यात सर्वात कमी आहे.

बरे होण्याचे प्रमाण घटले

गत आठ महिन्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत रुग्णसंख्या वाढीसोबतच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय होते; परंतु नोव्हेंबर महिन्यात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. महिनाभरात केवळ ५७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली.

गत आठ महिन्याची स्थिती

महिना - रुग्ण - बरे झालेले रुग्ण - मृत्यू

एप्रिल - २८ - ११ - ३

मे - ५५३ - ४२१ - २९

जून - ९६९ - ७१३ - ४७

जुलै - १०८७ - ९५१ - २६

ऑगस्ट - १४०० - ११६४ - ४७

सप्टेंबर - ३४६८ - २६४४ - ८४

ऑक्टोबर - ८९३ - २०२८ - ४५

नोव्हेंबर - १०३३ - ५७९ - १२

Web Title: Fluctuations in patient growth after September!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.