उड्डाण पुलाचे काम बंद; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक
By रवी दामोदर | Published: October 9, 2023 07:18 PM2023-10-09T19:18:43+5:302023-10-09T19:18:55+5:30
पुलावर केले अभिनव आंदोलन: काम त्वरीत पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याची मागणी
अकोला: शहरात उड्डाणपुलाचे थाटात उद्घाटन करून वाहतूकीसाठी पूल खुला केला. परंतू अवघ्या सहा महिन्यातच पूल क्षतिग्रस्त होऊन गत वर्षभरापासून उड्डाण पूल वाहतूकीसाठी बंद आहे. त्यात पुलाचे कामही बंद असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक पवित्रा घेत ‘पुलाचे काम बंद, पुलावर वाहतूकही बंद’अशा घोषणा व बॅनर झळकावित सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास अभिनव आंदोलन केले.
उड्डाण पुलाचे काम त्वरित पूर्ण करून, पूल वाहतूकीसाठी सुरू करावा, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला. आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनात वंचित युवा आघाडीचे पुर्व महानगर अध्यक्ष जय तायडे, जिल्हाध्यक्ष घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, निलेश इंगळे, नितिन वानखडे, आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुणबी, आशिष रायबोले, ॲड. मीनल मेंढे, ॲड. सुबोध डोंगरे, अमोल जामनिक, संघपाल आठवले, आकाश धुळभरे, राजेश बोदडे, सागर इंगळे (पातुर), वैभव खडसे, विजय शिंदे, आशिष सोनोने, मनोज बागडे, धीरज अंभोरे, सनी डोंगरे, अभिषेक खोंड, आदेश इंगळे, आशिष गवई, अनुज क्षीरसागर, अब्दुल नजर अब्दुल फाईन, राधे धाडसे, सनी पोहरे, निखिल सहस्त्रबुदे, शुभम धाडसे, अमोल लांडगे, प्रवीण घाटे, बाबू इंगळे, अनिल अंभोरे, अमोल कांबळे, अजय तिडके आदी उपस्थित होते.