उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:31+5:302020-12-07T04:13:31+5:30
खरप परिसरात डासांचा प्रादुर्भाव अकोला : खरप बु. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नाल्यांची नियमित सफाई केली जात नाही. ...
खरप परिसरात डासांचा प्रादुर्भाव
अकोला : खरप बु. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नाल्यांची नियमित सफाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छतेमुळे डेंग्यूसह इतर साथीचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने परिसरात स्वच्छता करण्याची मागणी ग्रास्थांकडून केली जात आहे.
न्यू तापडियानगरात रस्त्यांवर खड्डे
अकोला : न्यू तापडियानगर ते खरप मार्गाची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यासोबतच मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. येथून जाणाऱ्या वाहनधारकांना याचा धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासह रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाठदुखीच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांचा विनामास्क प्रवास
अकोला : ऑटो असो वा एसटी बस प्रवाशांकडून विनामास्क प्रवास केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रवासामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाईची आवश्यकता असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
अकोला : जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांसह मोठ्या व्यावसायिकांकडूनही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर काही प्रमाणात महापालिका प्रशासनातर्फे कारवाई केली होती. मात्र त्यानंतर महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
भाजीबाजार परिसरात रस्त्यावर पार्किंग
अकोला : रेल्वेस्थानक मार्गावर उड्डाणपूल निर्मितीचे काम सुरू आहे. या मार्गावरून अवजड वाहनांचीही वर्दळ सुरू असते. मार्गावरच जनता भाजीबाजार असल्याने रविवारी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने या मार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक ऑटोचालकही मध्येच ऑटो उभे करत असल्याने समस्या वाढत आहे.