वीज ग्राहकांचा ‘कॅशलेस’वर भर

By Admin | Published: March 17, 2017 03:12 AM2017-03-17T03:12:21+5:302017-03-17T03:12:21+5:30

अकोला परिमंडळ : ९४ हजार ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरले १३ कोटींचे देयक

Focus on electricity customers' cashless | वीज ग्राहकांचा ‘कॅशलेस’वर भर

वीज ग्राहकांचा ‘कॅशलेस’वर भर

googlenewsNext

अकोला, दि. १६- बदलत्या काळानुसार वीज ग्राहकही आता टॅक्नोसेव्ही होत असून, वीज देयक भरण्यासाठी ह्यकॅशलेसह्णवर भर दिल्या जात आहे. अकोला परिमंडळातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्हय़ांमधील ९४ हजार ३६३ वीज ग्राहकांनी फेब्रुवारी महिन्यात १३ कोटी ४२ लाख ८१ हजार ७४७ रुपयांचा भरणा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइनह्णच्या विविध पर्यायांचा वापर करून केल्याची माहिती समोर आली आहे.
आधुनिक काळात सर्वच व्यवहार आता ह्यऑनलाइनह्ण होत असताना महावितरणने वीज बिल भरण्यासाठी संकेत स्थळावर ह्यऑनलाइनह्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच मोबाइल अँपद्वारेही वीज देयक भरता येते.
ह्यटेक्नोसॅव्हीह्ण झालेले वीज ग्राहक आता या सुविधेचा मोठय़ा प्रमाणात लाभ उचलत आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला ग्रामीण, अकोला शहर, अकोट, बुलडाणा, खामगाव, मलकापूर व वाशिम या सात विभागांमधील एकूण ९४ हजार ३६३ वीज ग्राहकांनी फेब्रुवारी २0१७ या एकाच महिन्यात १३ कोटी ४२ लाख ८१ हजार ७४७ रुपयांचे वीज देयक भरले. यासाठी त्यांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाइल अँपचा वापर केला. ग्रामीण भागातही आता ह्यऑनलाइनह्ण देयक भरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नोटाबंदीनंतरच्या काळात झाली वाढ!
केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी चलनातून हजार व पाचशे रुपयांचे दर्शनी मूल्य असलेल्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर आता ह्यकॅशलेसह्ण व्यवहारांवर भर दिल्या जात आहे. महावितरणने वीज ग्राहकांसाठी आधीपासूनच ऑनलाइन देयक भरण्यासाठी मोबाइल अँप्स, संकेतस्थळ असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नोटाबंदीनंतरच्या काळात ह्यऑनलाइनह्ण पद्धतीचा वापर करून देयक भरणार्‍यांची संख्या वाढली आहे.
 

Web Title: Focus on electricity customers' cashless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.