राज्यात तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:48 PM2018-12-22T18:48:20+5:302018-12-22T18:48:32+5:30

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून यावर्षीपासून रेशीम उत्पादनासाठी तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर रेशीम संचालनालयाने भर दिला आहे.

 Focusing on doubling the area of silk farming in the state! | राज्यात तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर भर!

राज्यात तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर भर!

Next

अकोला :‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून यावर्षीपासून रेशीम उत्पादनासाठी तुतीचे क्षेत्र दुप्पट करण्यावर रेशीम संचालनालयाने भर दिला आहे. यानुषंगाने राज्यात महाअभियान राबविण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील पाच शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी गावोगावी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
राज्यात आजमितीस सात हजार हेक्टरवर तुती लागवड, रेशीम उत्पादन घेण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत हे क्षेत्र दोन हजार हेक्टर आहे. रेशीम शेतीला चालना देण्यासाठी आता राज्यातच कशिदा काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन तुती लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी तुती लागवड करण्यासाठीची नोंदणी सुरू केली आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकºयांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून जवळपास २० हजारांच्यावर अनुदान शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जात असून, कीटक संगोपन व गृह बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च अपेक्षित असल्याने त्याच्या ५० टक्के म्हणजे एक लाख रक्कम अनुदान दिली जाते. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी ही कमी खर्चाची शेती करावी, यासाठी अमरावती विभागीय रेशीम शेती कार्यालयातर्फे शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात असून, यासाठी या भागातील शेतकºयांचे अभ्यास दौरे काढली जात आहेत.
पश्चिम विदर्भात चांगल्यापैकी जम बसविणाºया या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणाºया तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, दोन हजार एकर क्षेत्र दुप्पट करण्यावर भर आहे. अकोला जिल्ह्याला यावर्षी ३०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
- उत्पादन देणारी रेशीम शेती
निसर्गात पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. यापासून निर्माण होणारा रेशीम धागा अतिशय लोकप्रिय असून, त्याला मिळणारी किंमतही भरपूर असल्याने शेतकºयांनी रेशीम उत्पादनाकडे वळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे.

- रेशीम कोष उत्पादन वाढविण्यासाठी महाअभियान राबविण्यात येत असून, पश्चिम विदर्भात शेतकºयांचा चांगला प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून रेशीम शेती के ली जात आहे.
व्ही. बी. ठाकरे,
प्रभारी रेशीम अधिकारी,
अकोला.

 

Web Title:  Focusing on doubling the area of silk farming in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.