१७४ शाळांचा पट २० पेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:10+5:302021-02-24T04:20:10+5:30
गत काही वर्षांत शहरांसह खेड्यांमध्येही काॅन्व्हेंट सुरू झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर हाेत आहे. समायाेजनाची प्रक्रिया ...
गत काही वर्षांत शहरांसह खेड्यांमध्येही काॅन्व्हेंट सुरू झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर हाेत आहे.
समायाेजनाची प्रक्रिया करावी लागेल
जिल्ह्यातील १७४ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्याने त्यांचे समायाेजन करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करावी लागणार आहे. या शाळांचे नजीकच्या शाळांत समायाेजन करण्यात येऊ शकते का, याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली
शिक्षकांचे हाेणार समायाेजन
शाळा बंद केल्याने किंवा समायाेजन केल्याने शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या शिक्षकांचे समायोजन रिक्त जागा असलेल्या जि.प. शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचे नियाेजन सध्या शिक्षण विभागाच्या वतीने सुरू आहे. बंद करण्यात आलेल्या किंवा समायाेजित करण्यात आलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायाेजन करण्यात येणार आहे.