काेराेना नियमांसह आचारसंहितेचे पालन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:11 AM2020-12-28T04:11:20+5:302020-12-28T04:11:20+5:30
हिवरखेड : जानेवारीत हाेत असलेली ग्रामापंचायत निवडणूक शांततेत पार पाडा, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता समिती सदस्यांनी पाेलिसांच्या ...
हिवरखेड : जानेवारीत हाेत असलेली ग्रामापंचायत निवडणूक शांततेत पार पाडा, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता समिती सदस्यांनी पाेलिसांच्या संपर्कात राहून सहकार्य करावे. काेराेनाचे नियम पाळून सर्वांनी मास्कचा वापर करावा, निवडणूक आयाेगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आचारसंहितेचा भंग हाेणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पाेलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व गाेपाल दातीर यांनी केले.
हिवरखेड येथील पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शांतता समिती पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याेवळी पाेलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व गोपाल दातीर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शांतता समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी शोयबअली मीरसाहेब, डाॅ. राम तिडके, जमीरभाई पठाण, रमेश दुतोंडे, पोलीसपाटील प्रकाश गांवडे, मधुकर पोके, महेंद्र भोपळे, प्रवीण येऊल, डाॅ. शकील अली मीरसाहेब, संजय देशमुख, बजरंग तिडके, पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब भोपळे, सादीकभाई, दशरथ गावंडे, राजू खान, पत्रकार बाळासाहेब नेरकर, केशव कोरडे, गोवर्धन गावंडे, संदीप इंगळे, अर्जुन खिराेडकर, गजानन राठोड, शांताराम कवळकार, सुरेश ओंकारे, मोईजभाई जमादार, दीपक रायबोले, बापूराव वाकोडे, गवई मेजर, शिवा गांवडे, कवळे मेजर, महादेव नेव्हारे, विनाेद गोलाईत, तायडे मेजर यांच्यासह पाेलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित हाेते.