शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:20+5:302021-05-20T04:19:20+5:30

अकाेला : शिक्षकांचे जिल्ह्यात वेतनासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत अनेकदा शिक्षक संघटनांकडून पाठपुरावाही करण्यात आला असून, त्याबाबत ...

Follow up on pending teacher demands | शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करा

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करा

Next

अकाेला : शिक्षकांचे जिल्ह्यात वेतनासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत अनेकदा शिक्षक संघटनांकडून पाठपुरावाही करण्यात आला असून, त्याबाबत प्रशासनावर दबाव निर्माण करण्यात यावा या मागणीसह शिक्षकांच्या जिल्हा व राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शिक्षक सेनेच्या ऑनलाईन सभेत चर्चा झाली.

२४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्यात यावी,अप्रशिक्षित शिक्षक यांचा व्यतीत कालावधी निवड व वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावा,जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी विषय शिक्षक व मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, पदोन्नती प्रक्रिया राबविणे , प्रलंबित चट्टोपाध्याय प्रस्ताव निकाली काढण्यात यावेत,विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. आदींबाबत यावेळी चर्चा झाली. बैठकीला अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे, प्रमोद मोकळकर, सुधाकर भाकरे, श्रावण इंगळे,विजय भांडे, गणेश उज्जैनकर,किशोर काकड , राजेश मैश्राम, सुरेश कडू, संजय भटकर, बाळकृष्ण डाखोरे ,दिलीप खांदे, शाम पाठक, संतोष टाले गजानन ठाकरे, खानझोडे,अर्चना सोळंके आदी सहभागी झाले हाेते.

....................

शिक्षकांचे लसीकरण करा

प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

अकाेला फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून विविध सरकारी यंत्रणांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. आता शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेने केली आहे. याबाबत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष महेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष मंगेश टिकार यावेळी अमर भागवत, हेमंतकुमार बोरोकार, राधेश्याम मंडवे, अमित फेंडर प्रमोद कोकाटे उपस्थित होते.

.......................................

Web Title: Follow up on pending teacher demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.