बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:41 PM2019-04-14T13:41:48+5:302019-04-14T13:41:53+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे हातरू न येथील ९२ वर्षिय तुकाराम डोंगरे यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साधलेला संवाद..

Followers should maintain loyalty to carry forward the work of Babasaheb - Tukaram Dongre | बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे 

बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे 

Next

अकोला: आंबेडकरी चळवळ ही स्वाभीमानाची चळवळ आहे.डॉ. बाबासाहेब आंबेकडरांनी आम्हाला स्वाभीमान, आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश दिला. बहुजन समाजासाठी तसेच देशासाठी त्यांनी केलेले काम लाखमोलाचे आहे. बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी आज खरी गरज आहे निष्ठेची... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे हातरू न येथील ९२ वर्षिय तुकाराम डोंगरे यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साधलेला संवाद..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत तुमचा संपर्क कधी आला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकोला येथे येऊन गेले. येथे त्यांची विशाल सभा झाली. मुबंई येथे बाबासाहेबांची सभा प्रत्यक्ष बघितली. बाबासाहेबांची सभा एकूण आम्हाला कार्य करण्याची दिशा मिळाली. स्फुलींग चेतले.तेव्हापासूनच शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने काम केले.सभा,मिरवणूक,समाजाच्या विविध लढ्यात सहभाग घेतला. जिल्ह्यातही ही चळवळ जोरात सुरू झाली.गावोगाव फिरू न आंबेडकरी,बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम आंबेडकरी चळवळींच्या नेत्यासोबत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुमची भेट झाली का ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत निष्ठेने काम करणे, समाजजागृती करणे हे आमचे ध्येय होते. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशशनच्या काळापासू आम्ही चळवळीत झोकून दिले होते.याच दरम्यान,बाबासाहेबांना जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली. बाबासाहेब प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान करायचे.

तुमच्या स्मरणातील घटना कोणती?
माझ्या स्मरणात राहणारा मुद्दा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ‘प्रबुध्द भारत’च्या वर्गणीच्या पोचपावतीची आहे. तसेच महापरिनिर्वाणानंतर सन १९६४ मध्ये चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता.त्यावेळी मीदेखील हातरू न येथून ९ रू पयांची मनीआॅडर पाठविली होती.ही मनीआॅडर ७ मे १९६४ रोजी भारतीय बौध्द महासभेच्यावतीने भैय्यासाहेब उपाख्य यशवंतराव आंबेडकर यांनी स्विकारली होती.त्यांच्या स्वाक्षरीची पोचपावती आणि मनीआॅडरची प्रत जपून ठेवली आहे.

बाबासाहेबांनी दिलेली ‘प्रबुध्द भारत’ची पोच पावती अनमोल ठेवा आहे.
ट्रायने लागू बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेडयूल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून चळवळीत एकनिष्ठेने काम करीत असताना,एक जिद्द होती.त्या काळात बाबासाहेबांनी सुरू केलेल्या चळवळीला वाहिलेल्या ‘ प्रबुध्द भारत’ चा मी वार्षिक वर्गणीदार होतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच मला ‘प्रबुध्द भारत’ ची सभासद वर्गणीची पोच पावती मला दिली होती.हा अनमोल ठेवा मी जपून ठेवला आहे.
‘ प्रबुध्द भारत’ चे तेव्हाचे अंकही जपून ठेवले आहेत. ते वाचले पुन्हा,पुन्हा बाबासाहेब असतानाचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो.तसेच दादासाहेब गायकवाड यांची भूमिहिनाची चळवळ, व येरवडा जेल आठवतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करायचे असेल,प्रत्येकाने चळवळीला योगदान दिले पाहिजे.‘ चळवळीचे ‘ प्रबुध्द भारत’ हे प्रत्येकाने हमखास घेणे क्रमप्राप्त आहे.कारण चळवळ जिवंत असली तरच आपण सलामत आहोत. म्हणूनच आता सर्वांनी सहभाग घ्यावा..
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत हिरारीने भाग घेण्याची जिल्ह्याची परंपरा आहे. त्याकाळात आम्ही तहान,भूक हरवून काम करायचो.

 - तुकाराम डोंगरे

 

Web Title: Followers should maintain loyalty to carry forward the work of Babasaheb - Tukaram Dongre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.