जेवणामधून विषबाधा

By admin | Published: June 28, 2015 11:13 PM2015-06-28T23:13:58+5:302015-06-28T23:13:58+5:30

जेवणामधून विषबाधा झाल्याने वृद्धाचा मृत्यू; पत्नीची प्रकृती चिंताजनक.

Food poisoning | जेवणामधून विषबाधा

जेवणामधून विषबाधा

Next

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : संग्रामपूर येथून जवळच असलेल्या आकोली बु. येथील रहिवासी पती -पत्नीला मासोळीचे जेवणामधून विषबाधा झाली. यामुळे पतीचा अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नीची प्रकृती अत्यवस्थ आहे. ही घटना २८ जून रोजी घडली. तालुक्यातील आकोली बु.येथील जामाजी दोरामन वानखडे वय ६0 वर्ष व सयाबाई जामाजी वानखडे वय ५५ यांनी २६ जून रोजी गावामध्ये आलेल्या फेरीवाल्याकडून संध्याकाळच्या जेवणाकरिता मासोळी विकत घेतली. जेवणानंतर थोड्याच वेळात त्यांना उलट्या, मळमळ, अशी लक्षणे सुरु झाली. त्यानंतर त्रास वाढल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान जामाजी वानखडे यांचा मृत्यू झाला. तर पत्नी सयाबाई वानखडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या पश्‍चात १ मुलगा, २ मुली व नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.

Web Title: Food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.