१८ लाख लाेकांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:45+5:302021-01-18T04:16:45+5:30
अकाेला : जिल्ह्यातील १८ लाख लाेकांच्या अन्नसुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे केवळ ६ अधिकारी असल्याची माहिती समाेर आली ...
अकाेला : जिल्ह्यातील १८ लाख लाेकांच्या अन्नसुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे केवळ ६ अधिकारी असल्याची माहिती समाेर आली आहे. १८ लाख लाेकसंख्या असताना अन्न विभागात ४ अन्न निरीक्षक तसेच औषध विभागात केवळ २ औषध निरीक्षक कार्यरत असल्याचे वास्तव आहे. यावरून जिल्ह्यातील १८ लाख लाेकांची अन्नसुरक्षा धाेक्यात आहे.
शहरासह जिल्ह्यातील हाॅटेल्समध्ये निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री हाेत असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यरत आहे. यासाेबतच औषध दुकानांमध्ये हाेणारी हेराफेरी राेखण्यासाठी आणि एक्सापायरी डेट झालेल्या औषधी विक्री हाेत असेल तसेच विना फार्मासिस्ट औषध दुकान चालविण्यात येत असेल तर त्यांच्यावर औषध प्रशासन विभाग कारवाई करते. अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या विभागात मात्र गत अनेक वर्षांपासून मुनष्यबळ प्रचंड कमी झाले आहे. यावर शासनाने ताेडगा काढण्याची मागणीही वारंवार झाली आहे. मात्र काहीही झाले नसल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील हाॅटेल्स १५६३
जिल्ह्यातील मेडिकल्स ७९४
अन्न निरीक्षक ०४
औषध निरीक्षक ०२
जिल्ह्याची लाेकसंख्या १८ लाख
काेट
अन्न् व औषध प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येते. तसेच दंडात्मक कारवाईही सुरू असते. ज्यांच्याकडे तपासणी केली त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात येतात. अहवाल आल्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात येताे.
- रावसाहेब वाकडे
अन्न निरीक्षक, अकाेला
११ चे झाले ४
जिल्ह्यात सुरुवातीला ११ अन्न निरीक्षक, तर ६ औषध निरीक्षक हाेते, मात्र ही संख्या वाढविण्याऐवजी कमी करण्यात आली आहे. आता जिल्ह्यात केवळ ४ अन्न निरीक्षक कार्यान्वित आहेत. त्यामुळे लाेकसंख्येच्या प्रमाणात अन्न निरीक्षकांची संख्या कमी असल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम तपासणी तसेच इतर कामांवर हाेताे.
लाेकसंख्या वाढली, अधिकारी घटले
जिल्ह्याची लाेकसंख्या १० लाखांपेक्षा कमी असताना ११ अन्न निरीक्षक हाेते. तर आता १८ लाख लाेकसंख्या झाल्यानंतर अधिकारी वाढले तर नाहीच उलट त्यांची संख्या कमी करून केवळ ४ अन्न निरीक्षक ठेवण्यात आले आहे. तर असाच प्रकार औषध विभागातही असल्याचे समाेर आले आहे.