मूर्ख संमेलनाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 02:32 AM2017-03-10T02:32:51+5:302017-03-10T02:32:51+5:30
अकोल्यात एकमेव होणारे संमेलन; यावर्षी निवडणूक व मतदान विषय राहणार.
अकोला, दि. ९- संपूर्ण राज्यात सुमारे ४५ वर्षांंपासून अविरत धूलिवंदनाच्या दिवशी आयोजित होणारे अकोल्यातील मूर्ख संमेलन सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. यावर्षी मूर्ख संमेलनात मतदान व निवडणूक हा विषय प्रामुख्याने राहणार आहे. स्थानिक कलाकार या मूर्ख संमेलनात आपली कला सादर करणार असल्याची माहिती मूर्ख संमेलनाचे मूर्खाधिराज विकास शर्मा यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा यांनी ४५ वर्षांंची मूर्ख संमेलनाची परंपरा सांगितली. धूलिवंदन हा समाजाचा होळी पर्वावर येणारा सामाजिक उपक्रम आहे. या पर्वावर रंग खेळून उत्सव साजरा करतात; मात्र खोलेश्वर येथील स्वातंत्र्यसैनिक तथा नगरसेवक डॉ. प्रभुदयाल शर्मा यांनी आपले पत्रकार मित्र रामकिशोर श्रीवास यांना सोबत घेऊन ४५ वर्षांंपूर्वी धूलिवंदनाच्या रंगात्मक खेळाला छेद देत अकोल्यात मूर्ख संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी याला ह्यअभिनव विधानसभाह्ण हे नाव देण्यात आले होते.
धूलिवंदनाच्या सायंकाळी तेव्हाच्या कॉटन मार्केट येथे हे विचार व प्रबोधनाचे व्यंगात्मक विधानसभा अधिवेशन भरविले जात होते. त्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री वर्गाचे व्यंगात्मक व मनोरंजनात्मक कामकाजाचे सादरीकरण करण्यात येत होते. सभा संपल्यावर पुढील वर्षाच्या धूलिवंदन कार्यक्रमापर्यंंत हे अधिवेशन तहकूब केल्या जात होते. कालांतराने हे कामकाज स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आणण्यात येऊन त्याचे नामकरण ह्यमूर्ख संमेलनह्ण करण्यात आले. हे संमेलन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. तत्कालीन खासदार असगर हुसेन, भु.ना. मुखर्जी, बाबा कोथळकर, शंकरराव खंडारे, कामगार नेते मधुकरराव उतखडे, ओ.पी. मिश्रा, मामा पांडे, मोहनलाल छावछरिय, रामेश्वर अग्रवाल, बाजीराव पाटील, पन्नालाल शर्मा, बळीराम चापळे, देवराव लोटे, मीणा उदासी, लक्ष्मणसिंग जाजोरिया आत्माराम डोंगरे, प्रा.नरेंद्र पुरोहित तसेच कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, शाहीर वसंतराव मानवटकर यांच्यासमवेत लोक प्रतिनिधी, कला साहित्य व शिक्षण क्षेत्रातील गणमान्यांचा सहभाग दरवर्षीची बाब झाली होती, असेही शर्मा यांनी सांगितले.