अवैध सावकारीप्रकरणी ११ व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:28 AM2017-10-25T01:28:32+5:302017-10-25T01:28:45+5:30

अकोला : बनावट दस्तावेजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच  अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रु पयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील ११ व्यावसायिकांविरुद्ध  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा कट  रचण्यासह अवैध सावकारीचे गुन्हे दाखल केले आहेत. 

Foreclosure against 11 professionals in illegal money laundering case | अवैध सावकारीप्रकरणी ११ व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी

अवैध सावकारीप्रकरणी ११ व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी

googlenewsNext
ठळक मुद्देया ११ व्यापारी, प्रतिष्ठानांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बनावट दस्तावेजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच  अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रु पयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील ११ व्यावसायिकांविरुद्ध  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा कट  रचण्यासह अवैध सावकारीचे गुन्हे दाखल केले आहेत. 
सुधीर कॉलनी येथील रहिवासी तसेच शेअर ब्रोकर अनुप  गुलाबराव आगरकर नामक व्यक्तीने अनुप माहेश्‍वरी  (डोडिया)कडून २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या  कर्जाच्या मोबदल्यासाठी ३३0 धनादेश अनुप आगरकरने  माहेश्‍वरी याला दिले होते. कर्ज स्वरूपात घेतलेल्या २३ लाख  रुपयांचे तब्बल ७८ लाख रुपये व्याजासह परतफेड करण्यात  आले होते; मात्र त्यानंतर माहेश्‍वरीने  ३ ते ७ टक्के दरमहा  दरशेकडा व्याजदराने अनुप आगरकरकडून रक्कम वसुली सुरू  केली होती. एवढेच नव्हे, तर सदर ३३0 धनादेशांपैकी काही  धनादेश ऋषभ मार्केटिंग, अनुपकुमार आशिषकुमार, जी. एम.  ट्रेडिंग, दीपक कृषी सेवा केंद्र संचालक दीपक झांबड, मराठा  कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रभाकर गावंडे, अटल ट्रेडर्स, कोरपे  ब्रदर्स, राहुल राठी, राकेश राठी, आशिष माहेश्‍वरी यांना देऊन  त्यांनीही सदर धनादेशाद्वारे रक्कम उकळली होती. 
जनता बँक व एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून हे व्यवहार पार  पडल्याचेही समोर आले आहे. धनादेशांचा गैरवापर करीत  विविध लोकांना ते देऊन बनावट दस्तावेजाद्वारे तसेच खोटी नावे  वापरून ही बेकायदा वसुली करण्यात आली आहे. प्रतिष्ठान  तसेच सदर व्यापार्‍यांना अशा प्रकारे वसुलीचे अधिकार नसताना  त्यांनी ही रक्कम उकळली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख  गणेश अणे यांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे  आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर या प्रकरणात सदर प्र ितष्ठान व व्यापार्‍यांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0, ४६७,  ४६८, ४७१, १२0 ब, ३८४ तसेच महाराष्ट्र सावकारी  अधनियम २0१४ च्या कलम ३९ आणि ४५ नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

या ११ व्यापारी, प्रतिष्ठानांचा समावेश
अवैध सावकारी व फसवणूक प्रकरणात ऋषभ मार्केटिंग, दी पक कृषी सेवा केंदाचे दीपक झांबड, आशिष माहेश्‍वरी, कोरपे  ब्रदर्स, अटल ट्रेडर्स, अनुपकुमार आशिषकुमार, अनुप डोडिया,  जी. एम. ट्रेडिंग, राहुल राठी, राकेश राठी, मराठा कृषी सेवा  केंद्राचे प्रभाकर गावंडे यांच्याविरु द्ध गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. सदर प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने या प्रकरणत  आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास केल्यानंतरच पुढील पावले  उचलण्याची मागणी होत आहे.

व्यवसायातील खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी  हुंडीचिठ्ठीचा दलाल असलेले अनुप डोडिया यांच्याकडून एक  वर्षापूर्वी काही दिवसांसाठी रक्कम घेण्यात आली होती. सदर  रक्कम धनादेशाद्वारे घेण्यात आली व धनादेशाद्वारेच परत करण्या त आली. यामध्ये आपण कुणाचीही फसवणूक केली नसून,  आमचीच फसवणूक झाली आहे.
- प्रभाकर गावंडे,
जिल्हाध्यक्ष, कृषी व्यावसायिक संघ, अकोला.

Web Title: Foreclosure against 11 professionals in illegal money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा