विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:35 AM2021-02-28T04:35:20+5:302021-02-28T04:35:20+5:30

मध्यवर्ती बस स्थानकावरून आरोपी अटकेत अकोला : सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे एक युवक विदेशी बनावटीची ...

Foreign-made pistols and live cartridges seized | विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

Next

मध्यवर्ती बस स्थानकावरून आरोपी अटकेत

अकोला : सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे एक युवक विदेशी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन असल्याच्या माहितीवरून शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने छापा टाकून या युवकास अटक केली. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

जुने शहरातील रहिवासी शाकीर खान अहमद खान हा मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुस घेऊन असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांना मिळाली. हा युवक या पिस्तुलचा वापर करणार असल्याचेही त्यांना कळले. या माहितीवरून त्यांनी तातडीने पथकाला कामाला लावून या युवकास बस स्थानकाच्या पाठीमागून अटक केली. त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार नेवारे, जितेंद्र हरणे, महेन्द्र बहादुरकर, नदीम शेख, राज चंदेल, रवी गिवे, विनय जाधव, संजय टाले, निखील माळी यांनी केली.

Web Title: Foreign-made pistols and live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.