श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे होणार फेरसर्वेक्षण
By Admin | Published: July 13, 2015 01:15 AM2015-07-13T01:15:05+5:302015-07-13T01:15:05+5:30
लोकसंख्येच्या तुलनेत लाभार्थी संख्येत असमतोल.
बुलडाणा : वृद्धांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत बर्याच जिल्ह्यांमध्ये असमतोल आढळून आला आहे. त्यामुळे विविध योजनेत सहभागी वृद्ध लाभार्थ्यांंचे विशेष सहाय्य योजनेतून फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने १0 जुलै रोजी घेतला आहे. वृद्ध महिला आणि पुरुषांना आर्थिक मदत करण्यासाठी श्रावण बाळ योजना राबविली जाते. या लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विशेष साहाय्य योजने अंतर्गत अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात असलेल्या लाभार्थ्यांंंची संख्या पुन्हा तपासण्यात येणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात बैैठक झाली. लोकसंख्येच्या तुलनेत विभागाच्या पाचही जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी आहेत. अमरावती जिल्ह्यात २८ लाख ८८ हजार लोकसंख्या असताना श्रावण बाळ योजनेचे १ लाख ६0 हजार लाभार्थी आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २८ लाखांच्या लोकसंख्येत ९७ हजार आणि यवतमाळ जिल्ह्यात २४ लाख लोकसंख्या असताना २६ हजार श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत.
*नेमकी लाभार्थी संख्या कळेल
श्रावणबाळ योजने अंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्ररेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार स्त्री, पुरुषांना ६00 रुपये प्रतिमहा राज्य शासनाकडून देण्यात येते. याच लाभार्थ्यांंना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नवृत्तिवेतन योजनेचे २00 रुपये प्रतिमहा प्रति लाभार्थी नवृत्तिवेतन देण्यात येते. लोकसंख्येच्या तुलनेत श्रावणबाळ योजनेच्या विभागातील लाभार्थ्यांचा असमतोल बघता या योजनेतील लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यामुळे लाभार्थ्यांंची नेमकी संख्या कळेल.
विभागातील योजनेतील लाभार्थी
जिल्हा श्रावण बाळ योजना
अमरावती १,५९३४६
अकोला ३२६८१
यवतमाळ २६१४२
बुलडाणा ९६५३६
वाशिम ५0३२५
एकूण ३६५0३0