वन विभाग होणार ‘हाय टेक’
By Admin | Published: September 13, 2014 11:31 PM2014-09-13T23:31:02+5:302014-09-14T01:52:51+5:30
कर्मचार्यांना मिळणार ‘पीडीए’: वन गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई.
अकोला: राज्यातील इतर शासकीय विभागांप्रमाणेच वन विभागही लवकरच हाय टेक होणार आहे. वन कर्मचार्यांना आता पर्सनल डिजिटल असिस्टंट (पीडीए) या नावाने ओळखल्या जाणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रे देण्यात येणार आहेत. निर्मनुष्य जंगलात कोणताही गुन्हा घडल्यास, त्याची छायाचित्रे व पंचनामा तात्काळ वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पीडीएचा वापर केला जाईल. त्यामुळे गुन्ह्यांचा जलद गतीने तपास होऊन, दोषींवर सबळ पुराव्यांच्या आधारे त्वरीत कारवाई करणे शक्य होणार आहे.
जंगलामध्ये वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार किंवा इतर कोणताही वन गुन्हा घडल्यास, चौकशी, पंचनामा व नंतर त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यामध्ये बराच कालावधी उलटतो. परिणामी गुन्हा घडल्यावर प्रत्यक्ष तपास सुरू होईपर्यंत त्यातील गांभीर्य संपते. वन कर्मचारी कॅमेर्याने छायाचित्रे काढून, पंचनामादी सोपस्कार आटोपल्यानंतर कागदपत्रे गोळा करून टपालाने वरिष्ठांकडे कार्यालयात पाठवितात. बरेचदा जंगलातील घटनास्थळापासून टपाल कार्यालय लांब असल्याने, किंवा कागदपत्रे पाठविण्याची दुसरी सुविधा उपलब्ध नसल्याने, कर्मचार्यांना स्वत: कार्यालयात जाऊन अहवाल सादर करावा लागतो. एखाद्या हिंस्त्र प्राण्याने गुराढोरांची शिकार केल्याचे आढळल्यास, हिंस्त्र प्राण्याच्या पायाचे ठसे व शिकारीचे स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याकरिता वरिष्ठ अधिकार्यांना बरेचदा घटनास्थळी जावे लागते. त्याकरिता सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागतो.
या पार्श्वभूमीवर तपास जलदगतीने होण्यासाठी ह्यहाय टेकह्ण यंत्रणा वापरण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. त्यासाठी जंगलामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना पीडीए देण्यात येणार आहेत.
** गुन्हा व कारवाईचा राहणार कोड वर्ड
जंगलामध्ये कोणता गुन्हा घडला व त्याचे स्वरूप काय आहे, याची माहिती देण्यासाठी वन कर्मचार्यांना गुन्ह्यानुसार काही कोड वर्डही देण्यात येणार आहेत. जंगलात एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची माहिती विभागाबाहेरील व्यक्तीला मिळू नये व कारवाई गुप्त राहावी, यासाठी ह्यकोड वर्डह्ण वापरण्यात येणार आहेत.
** १६ सप्टेंबरला कार्यशाळा
राज्यात वन विभागाच्या विभागीय कार्यालयांमध्ये १६ सप्टेंबरला ह्यपीडीएह्ण व त्याच्या वापराबद्दल कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेला वन विभाग, वन्य जीव विभाग व सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत पीडीएचा वापर, त्याची उपयुक्तता व त्यामध्ये येणार्या अडचणींची माहिती देण्यात येणार आहे.