लाच स्वीकारताना वनरक्षकाला पकडले!
By admin | Published: May 31, 2016 01:57 AM2016-05-31T01:57:24+5:302016-05-31T01:57:24+5:30
मेहकर तालुक्यातील घटना; २५ हजारांची स्वीकारली लाच.
मेहकर (जि. बुलडाणा): सागवान लाकडे जप्तप्रकरणी कारवाई न करण्याप्रकरणी घाटबोरी येथील वनरक्षक नागरे यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मेहकर तालुक्यातील मौजे विश्वी येथील सुतार काम करणारा तक्रारकर्ता मूलचंद कनीराम जाधव वय ४५ यांनी २९ मे रोजी लाचलुच पत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली की, घाटबोरी येथील वनरक्षक कैलास नागरे व त्यांच्या सहकार्यांनी २९ मे रोजी माझ्या घरी छापा मारुन घरातील सागवानची लाकडे व अवजारे जप्त केली होती व माझ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी कोर्या कागदावर व टाइप केलेल्या कागदावर सह्या घेतल्या. यावेळी कारवाई न करण्यासाठी व लाकडे अवजार परत देण्यासाठी ४0 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून ३0 मे २0१६ रोजी छापा मारला. यावेळी प्रकरण आपसात करण्यासाठी आरोपी नागरे यास घाटबोरी येथील शेतमजूर धोंडू नवले यांच्यामार्फत आठवडी बाजाराच्या ओट्यावर तक्रारकर्ते मुलचंद जाधव यांच्याकडील २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, विलास देशमुख, व्ही.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.भाईक, श्याम भांगे, संजय शेळके, सुखदेव ठाकरे, नीलेश सोळुंके यांनी काम पाहिले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.