अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे बदलणार स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:59 AM2020-11-09T10:59:43+5:302020-11-09T11:02:48+5:30
Amravati University's markssheet will change उन्हाळी २०२१ परीक्षेपासून सुधारित गुणपत्रिका मिळणार आहे.
अकाेला : भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी लक्षात घेता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणपत्रिकेचे स्वरूप बदलणार आहे. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास असणार आहे. उन्हाळी २०२१ परीक्षेपासून सुधारित गुणपत्रिका मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी चालविली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर शैक्षणिक बाबी अंतर्भूत असणार आहे. पहिले सत्र ते शेवटच्या सत्रातील विषयनिहाय गुण, टक्केवारीदेखील गुणपत्रिकेवर अंकित असेल. आता दिलेल्या गुणपत्रिकेवर शिक्षणाविषयी मोजकाच उल्लेख असल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठात प्रवेशासाठी ही बाब अपुरी पडत असल्याचे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्धारे मांडली होती. त्याअनुषंगाने गुणपत्रिकेत बदल होणार आहे
असा राहील बदल
- सर्व सत्राचे सेमिस्टर ग्रेड पॉइंट ( एनजीपीए)
- प्रत्येक सत्राची टक्केवारी
- विषयनिहाय प्रत्येक सत्राची वर्गवारी (डिस्टिंशन)
शेवटच्या सत्राचे ग्रेड पॉइंट (सीजीपीए) गुणपत्रिकेचा पॅटर्न संदर्भात परीक्षा मंडळ, विद्या परिषदेत चर्चावजा निर्णय झाल्यानंतरच बदल होईल. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने तयारी चालविली आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, अमरावती विद्यापीठ