माजी महापौरांचे शिवसेना प्रवेशासाठी ‘लॉबिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:28 AM2020-07-01T10:28:12+5:302020-07-01T10:28:34+5:30

शहरातील एका माजी महापौरांनी आता शिवसेना प्रवेशासाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरूकेली आहे.

Former mayor lobbies for Shiv Sena entry | माजी महापौरांचे शिवसेना प्रवेशासाठी ‘लॉबिंग’

माजी महापौरांचे शिवसेना प्रवेशासाठी ‘लॉबिंग’

Next

अकोला : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ‘हात’ दाखवून दुसऱ्या नवख्या पक्षाचे तिकीट घेऊन नशीब आजमावणाºया शहरातील एका माजी महापौरांनी आता शिवसेना प्रवेशासाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरूकेली आहे. आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता सेनेत प्रवेशासाठी तयार झालेल्या माजी महापौरांच्या महत्त्वाकांक्षी अटी व शर्ती लक्षात घेता त्यांच्या पक्षप्रवेशाला ग्रहण लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून आतापासूनच चाचपणी केली जात आहे. यामध्ये शिवसेना व भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून, मनपा निवडणूक लक्षात घेऊन विविध आघाडी, सेलमध्ये पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. आॅक्टोबर २०१९ मध्ये पार पडलेली विधानसभा निवडणूक अनेक कारणांसाठी रंजक ठरली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मागील २५ वर्षांपासून सलग विजय प्राप्त करणाºया भाजपची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. अवघ्या २,३०० मतांनी काँग्रेस उमेदवाराचा निसटता पराभव झाल्याने भाजपच्या अतिआत्मविश्वासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. यादरम्यान, पक्षाला ‘हात’ दाखवत एका नवख्या पक्षाच्या तिकिटावर नशीब आजमावणाºया माजी महापौरांनी आता मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे बोट धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आला होता; परंतु त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्या परस्पर पक्ष प्रवेशाच्या हालचाली होत असल्याने संबंधित माजी पदाधिकाºयाचा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही. यावेळी आ. नितीन देशमुख यांची संमती मिळवल्यानंतर पक्ष प्रवेशावर प्राथमिक चर्चा पार पडल्याची माहिती आहे; परंतु या चर्चेदरम्यान संबंधित माजी पदाधिकाºयाने ठेवलेल्या अटी व शर्ती पाहता उपस्थितांच्या भुवया उंचावल्याची चर्चा आहे. त्यानंतर हा विषय पक्षाने बाजूला सारल्याचे बोलल्या जात आहे.


भाजपसाठी धोक्याची घंटा
आगामी मनपा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाआघाडी होण्याचे संकेत आहेत. राज्य शासनाने प्रभाग रचना बाजूला सारत वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याचे सूचित केले आहे. तसे झाल्यास मनपा निवडणुकीचे निकाल अचंबित करणारे ठरतील, असे कयास लावले जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अवतीभोवती फिरणारे राजकारण लक्षात घेता ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.



राष्ट्रवादीतही चाचपणी
कोणत्याही परिस्थितीत आगामी मनपा निवडणूक लढायचीच, या विचारातून माजी महापौरांना पाठीमागे सक्षम पक्षाचे ‘बॅनर’ हवे असल्याने त्यांनी आधी शिवसेनेकडे पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेशासाठी चाचपणी केल्याची शहरात चर्चा आहे.

 

Web Title: Former mayor lobbies for Shiv Sena entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.