हिंगणा येथे माजी सरपंचपतीवर प्राणघातक हल्ला
By Admin | Published: June 24, 2017 05:46 AM2017-06-24T05:46:24+5:302017-06-24T05:46:24+5:30
ग्राम हिंगणा येथे क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवून दोन गटात मारहाण झाल्याची घटना २२ जूनच्या रात्री घडली.
पातूर : तालुक्यांतर्गत येत असलेल्या ग्राम हिंगणा येथे क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवून दोन गटात मारहाण झाल्याची घटना २२ जूनच्या रात्री घडली.
हिंगणा येथील माजी सरपंच वर्षा उपर्वट यांचे पती जीवन उपर्वट व त्यांच्या पुतण्याला क्षुल्लक कारणावरून अजय भास्कर इंगळे, विकास प्रभाकर इंगळे, विवेक प्रभाकर इंगळे सर्व रा. हिंगणा यांनी संगनमत करून कुर्हाडीने डोक्यावर मारून जबर जखमी केले. उपर्वट यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला असून, वृत्त लिहिस्तोवर आरोपीस अटक करण्यात आली नव्हती.