पडीक वार्डांवर गडांतर; मनपा आयुक्तांकडे प्रभागांची इत्थंभूत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:37+5:302021-04-16T04:18:37+5:30
निर्देशानुसार कामाचे नियाेजन करा ! प्रभागात साफसफाईसाठी काम करणारे एकूण सफाई कर्मचारी, त्यांची कामाची वेळ, प्रभागातील एकूण नाल्या, सर्व्हिस ...
निर्देशानुसार कामाचे नियाेजन करा !
प्रभागात साफसफाईसाठी काम करणारे एकूण सफाई कर्मचारी, त्यांची कामाची वेळ, प्रभागातील एकूण नाल्या, सर्व्हिस लाईन, रस्ते, सार्वजिनक ठिकाणे, बगिचे आदी इत्थंभूत माहिती आराेग्य निरीक्षकांनी सादर केली. ही सर्व माहिती ‘जीआयएस’प्रणालीद्वारे जमा करण्यात आली. यावेळी दिलेल्या निर्देशानुसार कामाचे नियाेजन करण्याचे आयुक्त निमा अराेरा यांनी स्पष्ट केले़
पडीक वाॅर्डांवर गडांतर
एका पडीक वाॅर्डात १२ याप्रमाणे शहरातील ५१ पडीक वाॅर्डात ६१२ खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यात एका पडीक वाॅर्डासाठी महिन्याकाठी किमान ९० हजार रुपये किंवा १ लाख रुपये देयक अदा करावे लागते. पडीक वाॅर्डातही आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी दिले आहेत.