अट्टल घरफोड्यांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:02 AM2017-09-29T02:02:56+5:302017-09-29T02:03:04+5:30
अकोला : शहरात घरफोड्यांसह गोदाम फोडणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रामदास पेठ पोलिसांना यश आले. या टोळीतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शहरातील चार चोर्यांची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात घरफोड्यांसह गोदाम फोडणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रामदास पेठ पोलिसांना यश आले. या टोळीतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शहरातील चार चोर्यांची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोदामात चोरी करीत सीसी कॅमेर्यांसह मशीन लंपास करण्यात आली होती. यासोबतच त्रीवनेश्वर कॉम्प्लेक्समधील एका दुकानात चोरी करीत मुद्देमाल पळविण्यात आला होता. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून अट्टल चोरट्यांच्या टोळीतील तिघांना अटक केली. यामध्ये बिस्मिल्ला खा जब्बार खा, मो. रफी मो. युसूफ व जीवन मोतीराम डोंगरे या तीन आरोपींचा समावेश आहे. या तिघांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याजवळून जुने शहरातील एका चोरी प्रकरणातील सोने हस्तगत करण्यात आले आहे. या चोरट्यांनी गोदाम चोरी, त्रीवनेश्वर कॉम्प्लेक्समधील चोरी तसेच जुने शहरात आणखी दोन चोर्या अशाप्रकारे एकूण चार चोर्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, रामदास पेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राठोड, नरेंद्र पदमने, अजाबराव वानखडे, जयंत सोनटक्के, शेख अन्सार, संजय अकोटकर, प्रशांत इंगळे, स्वप्निल खेडकर, स्वप्निल चव्हाण, नीलेश बुंदे यांनी केली.