लुटमार प्रकरणातील चारही आरोपींची कारागृहात रवानगी

By admin | Published: September 25, 2015 01:01 AM2015-09-25T01:01:28+5:302015-09-25T01:01:28+5:30

कोठडी बाजारातील मारहाण प्रकरण.

Four accused in the case of the robbery will be sent to jail | लुटमार प्रकरणातील चारही आरोपींची कारागृहात रवानगी

लुटमार प्रकरणातील चारही आरोपींची कारागृहात रवानगी

Next

अकोला: कोठडी बाजारातील व्यापारी धर्मेश व सुनील गुरुबानी यांना मारहाण करून १२ लाख रुपयांची बॅग लुटून नेणार्‍या चार आरोपींना गुरुवारी खदान पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. १0 डिसेंबर रोजी रात्री व्यापारी धर्मेश व सुनील बलरामदास गुरुबानी हे मोटारसायकलवर घरी जात असताना, आठ ते दहा आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवून त्यांच्याकडील १२ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात आणखी काही युवकांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान पोलिसांनी नंदकिशोर सांगळुदकर, राजेश भटकर, संदीप साठे, उमेश धुर्वे यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा २४ सप्टेंबरपर्यंत त्यांची पोलीस कोठडी वाढली होती. गुरुवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर चौघाही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांचीही कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. प्रकरणातील दहावा आरोपी विक्की बुंदेले यालासुद्धा खदान पोलिसांनी गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Four accused in the case of the robbery will be sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.