समशेरपूर येथील दुहेरी हत्याकांडातील चार आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:55+5:302021-07-02T04:13:55+5:30

ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे ३५ वर्षीय युवक धम्मपाल ऊर्फ आदेश महादेव आटोटे याची धारदार शस्त्राने ...

Four accused in Samsherpur double murder case go missing | समशेरपूर येथील दुहेरी हत्याकांडातील चार आरोपी गजाआड

समशेरपूर येथील दुहेरी हत्याकांडातील चार आरोपी गजाआड

Next

ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे ३५ वर्षीय युवक धम्मपाल ऊर्फ आदेश महादेव आटोटे याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी मारेकरी दीपकराज सहदेव डोंगरे (५३, राहा. प्रतीकनगर, मूर्तिजापूर) याला बेदम मारहाण केली. यात दीपकराज हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख, उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दीपकराज याच्या मारेकऱ्यांचा शोध घेत, पोलिसांनी १ जुलै रोजी चार आरोपींना अटक केली. सदर हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून घडले असल्याचे मृत धम्मपाल याचा भाऊ विनोद आटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच मृत दीपकराज डोंगरे याच्या मुलीची तक्रार पोलिसांनी ३० जून रोजी नोंदवून घेतली.

आटोटे कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा

मुलीच्या तक्रारीनुसार धम्मपाल याने जमाव करून माझ्या वडिलांना विनोद आटोटे, महादेव आटोटे, इंदूबाई आटोटे व आणखी ८ ते १० जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संतोष नागोराव आटोटे (४५), प्रभाकर जानराव आटोटे (३०), विजय लाला आटोटे (३३), जितेंद्र शत्रुघ्न आटोटे (३३) या चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

..असे घडले हत्याकांड

दीपकराज डोंगरे हे हत्या करण्याच्या उद्देशाने सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मूर्तिजापूरहून समशेरपूर येथील धम्मपाल याच्या घरी गेले. तेव्हा धम्मपालचा भाऊ बाहेर उभा होता. धम्मपाल याला काही कार्यकर्ते भेटायला येणार होते. त्यामुळे तो एका खोलीत तयारी करीत होता. धम्मपाल याला काही कळायच्या आत दीपकराज डोंगरे याने त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. यात तो जागीच गतप्राण झाला. दोघांच्या झटापटीत विनोदही जखमी झाला. दरम्यान, दीपकराज पळ काढत असतानाच, गावातील काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.

पोलिसांना होणार व्हिडिओची मदत

दीपकराज डोंगरे याला पकडून गावातील काही लोकांनी व नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात अनेकांचे चेहरे समोर आल्याने या व्हिडिओची आरोपी पकडण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे.

Web Title: Four accused in Samsherpur double murder case go missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.