चार उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गोल!

By admin | Published: May 18, 2014 12:55 AM2014-05-18T00:55:13+5:302014-05-18T00:55:32+5:30

अकोला मतदारसंघातील चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

Four candidates 'Deposit' Goal! | चार उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गोल!

चार उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गोल!

Next

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या निकालात एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश अर्थात १ लाख ६१ हजार ८९६ मतांपेक्षा कमी मते मिळालेल्या अकोला मतदारसंघातील चार उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये बसपाचे बी.सी.कांबळे, आपचे अजय हिंगणकर, बहुजन मुक्ती पार्टीचे शेख हमीद इमाम व अपक्ष संदीप वानखेडे इत्यादी चार उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशपेक्षा जास्त मते प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी मते प्राप्त होणार्‍या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी खदान परिसरातील शासकीय गोदामात झाली. मतमोजणीत एकूण ९ लाख ७२ हजार २८५ मते वैध ठरली. निवडणूक निकालात भाजपचे संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मते प्राप्त करून विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ आणि भारिप-बमसंचे अँड.प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ६६९ मते मिळाली. बसपाचे बी.सी.कांबळे यांना ७ हजार ८५६, आम आदमी पार्टीचे (आप) अजय हिंगणकर यांना ८ हजार ७६, बहुजन मुक्ती पार्टीचे शेख हमीद इमाम यांना ३ हजार ९९१ आणि अपक्ष संदीप वानखेडे यांना ३ हजार ७५६ मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत एक षष्ठांशपेक्षा कमी मते मिळाल्याने बसपाचे कांबळे, आपचे हिंगणकर, बमुपाचे शेख हमीद इमाम व अपक्ष वानखेडे इत्यादी चार उमेदवार अनामत रक्कम वाचविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या चार उमेदवारांचे डिपॉझिट गोल झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Four candidates 'Deposit' Goal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.