जिल्ह्यातील चार गुन्हेगार सहा महीन्यांसाठी हद्दपार; पाेलिस प्रशासनाकडून खबरदारी

By सचिन राऊत | Published: March 23, 2024 10:53 AM2024-03-23T10:53:08+5:302024-03-23T10:53:32+5:30

निवडणुक पूर्व खबरदारी म्हणून पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हयातील ४ गुन्हेगारांना सहा महीन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

four criminals in the akola district exiled for six months | जिल्ह्यातील चार गुन्हेगार सहा महीन्यांसाठी हद्दपार; पाेलिस प्रशासनाकडून खबरदारी

जिल्ह्यातील चार गुन्हेगार सहा महीन्यांसाठी हद्दपार; पाेलिस प्रशासनाकडून खबरदारी

सचिन राऊत, अकाेला : जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच निवडणुक पुर्व खबरदारी म्हणून पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हयातील ४ गुन्हेगारांना सहा महीन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्हयातील सिव्हील लाइन्स पोलीस स्टेशन हद्दीतील कुणाल प्रदिप देशमुख वय २३ वर्ष रा. फत्तेपुरवाडी, द्वारका नगरी, मोठी उमरी, रामदास पेठ पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील भोला रामचंद्र तिवारी वय २७ वर्ष रा. पवनसुत अपार्टमेंट, तापडिया नगर या दाेघांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशाने जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे. आकाेट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अब्दुल सुलतान अब्दुल ईरफान वय २२ रा. ताजनगर, अकबरी प्लॉट, अकोट व अकोट ग्रामिण पाेलिस स्टेशन हद्दीतील संतोष दिनकर काळे, रा. वडाळी देशमुख ता. अकोट या दाेघांना अशा प्रकारे चार जनांना मुंबई पोलीस अधिनियमान्वये जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्हयातील २७ सराईत गुन्हेगार हद्दपार अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर कारवाइ करण्यात येत आहे. पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या कार्यकाळात २७ जणांवर कारवाइ करण्यात आली आहे. निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.

Web Title: four criminals in the akola district exiled for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.