विदर्भात चार दिवस पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 02:36 PM2019-09-17T14:36:47+5:302019-09-17T14:36:59+5:30

चार दिवस तुरळक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Four days of rain in Vidarbha! | विदर्भात चार दिवस पाऊस!

विदर्भात चार दिवस पाऊस!

Next

अकोला: विदर्भात सतत पाऊस सुरू असून, येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील २४ तासात सोमवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत चिखलदरा व कोरपणा येथे ३० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
विदर्भात मागील २६ जुलैपासून पाऊस सुरू आहे. तथापि, पाऊस पडण्याचे प्रमाण असमान असून, पश्चिम विदर्भातील अकोला व लगतच्या जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचाच पाऊस होत आहे. त्यामुळे या भागातील धरणात अद्याप पूरक जलसाठा संचयित झाला नाही.
दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत बºयाच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून,२० ते २२ सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी तुरळक स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Four days of rain in Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.