दिवसभरात चौघांचा मृत्यू, ४४७ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:18 AM2021-04-15T04:18:07+5:302021-04-15T04:18:07+5:30

सायंकाळी अकोट येथील २९, पातूर येथील नऊ, खडकी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, पास्टूल ता. पातूर येथील ...

Four deaths during the day, 447 newly positive | दिवसभरात चौघांचा मृत्यू, ४४७ नव्याने पॉझिटिव्ह

दिवसभरात चौघांचा मृत्यू, ४४७ नव्याने पॉझिटिव्ह

Next

सायंकाळी अकोट येथील २९, पातूर येथील नऊ, खडकी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, पास्टूल ता. पातूर येथील पाच, देऊळगाव ता. पातूर येथील चार, कान्हेरी सरप, सहित, बार्शीटाकळी व महान येथील प्रत्येकी दोन, तर लोहगड, पुनोती, साखरविरा, मालेगाव, दगडपारवा, आस्टूल, गुरुकुल कॉलनी, बाळापूर, सुरज नगर, आपातापा, वाशिम बायपास, गुडधी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तीन महिला, एका पुरुषाचा मृत्यू

पंचशील नगर येथील ७२ वर्षीय महिला, बोरगाव मंजू येथील ६३ वर्षीय महिला व दहिहांडा येथील ७० वर्षीय पुरुष अशा तिघांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. सायंकाळी तेल्हारा येथील ७३ वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

२१४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील सात, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १६, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील दोन, ठाकरे हॉस्पिटल येथील एक, खैर उम्मीद हॉस्पिटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पिटल येथील सहा, नवजीवन हॉस्पिटल येथील तीन, क्रिस्टले हॉस्पिटल येथील तीन, बाॅईज हॉस्टेल एक, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशन येथील १३६, अशा एकूण २१४ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

४,००१ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,८४० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २७,३०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५३२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,००१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Four deaths during the day, 447 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.