काळेगावात काेरोनाने दहा दिवसांत चार मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:55+5:302021-05-26T04:19:55+5:30

भांबेरी, गाडेगाव व चितलवाडी गावांत सर्वांत जास्त रुग्ण आहेत. तालुक्यातील ९०० लोकसंख्या असलेल्या काळेगाव येथे दहा दिवसांत चार जणांचा ...

Four deaths in ten days by Carona in Kalegaon! | काळेगावात काेरोनाने दहा दिवसांत चार मृत्यू!

काळेगावात काेरोनाने दहा दिवसांत चार मृत्यू!

Next

भांबेरी, गाडेगाव व चितलवाडी गावांत सर्वांत जास्त रुग्ण आहेत.

तालुक्यातील ९०० लोकसंख्या असलेल्या काळेगाव येथे दहा दिवसांत चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच परिवारातील तिघांचा समावेश आहे. यामध्ये पांडुरंग पुंडलिक चौखंडे (८०) हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नानिबाई भाऊराव चौखंडे (६५) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला तर पांडुरंग पुंडलिक चौखंडे यांच्या मुलाचे २४ मेला निधन झाले. तसेच गजानन शालिग्राम चौखंडे (५४) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात ३९ रुग्ण सद्य:स्थितीत असून, भांबेरी येथे सर्वांत जास्त म्हणजे २४ रुग्ण आहेत. त्याखालोखाल गाडेगाव व चितलवाडी येथे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सदर रुग्ण अकोला तेल्हारा व काहु रुग्ण गावात घरांत क्वारंटाइन आहेत.

एसडीओ यांनी घेतला आढावा

उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तालुक्याचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी सील केलेल्या गावांमध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी करून पॉझिटिव्ह रुग्णांना घरी न ठेवता, शाळा किंवा कोविड सेंटरमध्ये ठेवावे, असे निर्देश दिले.

ग्रामीण भागातील रुग्ण संख्या पाहता, गावातील नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी, विलगीकरणासाठी सहकार्य करावे. गावात काही समस्या असल्यास संपर्क करावा.

- डॉ. संतोष येवलीकर,

तहसीलदार तेल्हारा

Web Title: Four deaths in ten days by Carona in Kalegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.