मूर्तिजापुरातून चार लाखांचा गुटखा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 17:54 IST2020-11-17T17:49:32+5:302020-11-17T17:54:33+5:30
Gutka stocks seized from Murtijapur ४ लाख रुपयांचा गुटख्यासह १० लाख रुपयांचा साठा जप्त केला.

मूर्तिजापुरातून चार लाखांचा गुटखा साठा जप्त
अकाेला : मूर्तिजापूर शहर तसेच ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची माेठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने वाहतूक व विक्री करणारा जिल्ह्यातील माेठा गुटखा माफिया सक्रिय असून, याच गुटखा माफियाच्या एका वाहनाच्या चालकाकडून पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी दुपारी सुमारे ४ लाख रुपयांचा गुटख्यासह १० लाख रुपयांचा साठा जप्त केला.
मूर्तिजापूर शहरातील रेल्वे स्टेशनसमाेरील एका दुकानातून माेठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल करण्यात येत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह पाळत ठेवून एम. एच. २७ बीएक्स ३२०३ क्रमांकाचे गुटख्याचे वाहन येताच पाेलिसांनी छापा टाकून हे वाहन पकडले. या वाहनाचा चालक विशाल राजेश घाेरसले यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा साठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वाहनाच्या चालकाविरुद्ध मूर्तिजापूर शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.