फेसबुकच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत अकाेला जिल्ह्यातील चार नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:28 AM2021-06-28T10:28:32+5:302021-06-28T10:29:10+5:30

Four leaders from Akola district are on Facebook's list of influential leaders : अकोला जिल्ह्यातील चार नेत्यांचा फेसबुकने ‘ब्लू टिक’ची मान्यता देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे.

Four leaders from Akola district are on Facebook's list of influential leaders | फेसबुकच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत अकाेला जिल्ह्यातील चार नेते

फेसबुकच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत अकाेला जिल्ह्यातील चार नेते

Next

अकाेला : फेसबुक या समाजमाध्यमाने देशविदेशातील सेलिब्रिटी लोकांचा त्यांच्या फेसबुक पेजवर ‘ब्लू टिक’ ची मान्यता देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. अकोला जिल्ह्यातील चार नेत्यांचा फेसबुकने ‘ब्लू टिक’ची मान्यता देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांचा यामध्ये समावेश आहे. फेसबुकवर सर्वाधिक १,९०,५२४ समर्थक (फॉलोअर्स) ॲड. आंबेडकरांचे असून दुसऱ्या क्रमांकावर डॉ. सुधीर ढोणे हे आहेत. डॉ. सुधीर ढोणे यांचे १,१९,२४३ समर्थक (फॉलोअर्स) असून तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे १,१६,८७८ तर चौथ्या क्रमांकावर माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे १,१५,४६७ समर्थक (फॉलोअर्स) आहेत. कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश प्रभावशाली नेत्यांच्या यादीत करण्यापूर्वी ‘ब्लू टिक’ची मान्यता देताना संबंधित नेत्यांच्या फेसबुक पेजवर असलेल्या समर्थकांची संख्या, त्यांनी पेजवर टाकलेल्या पोस्टला लाईक्स व शेअरच्या स्वरूपात मिळणारा प्रतिसाद, त्या राजकीय नेत्यांचे पद, समाजातील लोकप्रियता व प्रतिष्ठा या बाबींसोबत अन्य मुद्दे विचारात घेतल्या जातात.

ॲड. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार असून राज्यांत त्यांना बराच मोठा जनाधार आहे. संजय धोत्रे हे सलग चार वेळा लोकसभेत विजयी झाले असून केंद्रात राज्यमंत्री आहेत. डॉ. रणजित पाटील हे सलग दोन वेळा पदवीधर मतदार संघातून विजयी झाले असून मागील सरकारच्या काळात त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून तब्बल ६ खात्यांचा प्रभार होता. डॉ. सुधीर ढोणे हे काँग्रेस पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते असून राज्य कार्यकारिणीत त्यांचा समावेश आहे.

Web Title: Four leaders from Akola district are on Facebook's list of influential leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.