पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांचे सदस्यत्व बाद!
By admin | Published: August 31, 2016 02:55 AM2016-08-31T02:55:49+5:302016-08-31T02:55:49+5:30
अकोला मनपा हद्दवाढीचा फटका पंचायत समिती सदस्यांना बसला.
अकोला, दि. ३0: महानगरपालिकेच्या हद्दवाढीत अकोला पंचायत समितीच्या चार गणांचे पूर्ण क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गणाचे प्रतिनिधित्व करणार्या पंचायत समिती सभापतींसह चार सदस्यांचे सदस्यत्व बाद करण्यात आले आहे. त्यामुळे मनपा हद्दवाढीचा अकोला पंचायत समितीचे सभापती अरुण परोडकर यांच्यासह चार सदस्यांना फटका बसला आहे.
अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना ३0 ऑगस्ट रोजी शासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार मनपा हद्दवाढीमध्ये अकोला शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला पंचायत समितीच्या खडकी बु., मलकापूर भाग भाग-२, उमरी प्र. बाळापूर व शिवणी या चार गणांचे सर्व क्षेत्र हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या चारही गणाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सदस्यांचे सदस्यांना ३0 ऑगस्टपासून पदावरून दूर करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिला आहे. त्यानुसार पंचायत समितीचे सभापती अरुण परोडकर, उपसभापती गणेश अंधारे, सदस्य विशाल पाखरे व सदस्य विलास जगताप यांना सदस्य पदावरून दूर करण्यात आले.
'या' चार सदस्यांचे गेले सदस्यपद!
सदस्य पं.स.गण
अरुण शंकरराव परोडकर उमरी प्र. बाळापूर-१
गणेश वासुदेवराव अंधारे खडकी बु.
विशाल भगवान पाखरे मलकापूर भाग-२
विलास मदनराव जगताप शिवणी