आणखी चौघांचा मृत्यू, २०० नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:35 AM2021-02-21T04:35:13+5:302021-02-21T04:35:13+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६६२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६६२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४८९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील २३, जीएमसी येथील १२, कौलखेड येथील १०, डाबकी रोड येथील नऊ, विरवाडा ता.मूर्तिजापूर येथील आठ, भारती प्लॉट, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, दगडी पुल, खडकी व लखनवाडा येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ येथील चार, मलकापूर येथील तीन, व्हीबीएच कॉलनी,तुकाराम चौक, खडकी, धोगा, मोठी उमरी, जवाहर नगर, गायगाव, सूधीर कॉलनी, घुसर, मनकर्णा प्लॉट, गड्डम प्लॉट व खदान येथील प्रत्येकी दोन, व्यंकटेश नगर, कोठारी नगर, अशोक नगर, कलमेश्वर, रजपुतपूरा, पोलिस हेडक्वॉटर, अकोट फैल, स्वराज्य भवन, कान्हेरी सरप, जीएमसी हॉस्टेल, तापडीया नगर, नवरंग सोसायटी, गंगाधर प्लॉट, किर्ती नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर, गंगा नगर, तोष्णीवाल लेआऊट, बोरगाव मंजू, रवी नगर, विद्या नगर, अपोती, खोलेश्वर, वानखडे नगर, आश्रय नगर, केडीया प्लॉट, देवरावबाबा चाळ, शिवनगर, हाजी नगर, हरिहर पेठ, रतनलाल प्लॉट, पवन वाटीका, अकोली, जूने शहर, उमरी, मोरेश्वर कॉलनी, डोंगरगाव, गीता नगर, हिवरखेड, शिवाजी नगर, कोठारी वाटीका, एसबीआय कॉलनी, दहिहांडा, गायत्री नगर, शास्त्री नगर, पिंजर व पार्वती नगर येथील प्रत्येकी एक असे १७३ पॉझिटिव्ह आहेत.
तीन महिला व पुरुषाचा मृत्यू
शनिवारी सकाळी कृषि नगर, खदान येथील ३० वर्षीय महिला आणि विजय हाऊसिंग कॉलनी येथील ७३ वर्षीय महिला अशा दोन कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दोघींनाही अनुक्रमे १७ आणि ९ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी अकोट येथील ८० वर्षीय महिला व निंबा ता. मूर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष या आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या दोघांनाही अनुक्रमे १९ व १७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये २७ पॉझिटिव्ह
शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या १५१ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३३,६५६ चाचण्यांमध्ये २३४८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
७५ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १४, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पीटल येथून सात, अवघाते हॉस्पीटल येथून पाच, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून सात, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ३४ अशा एकूण ७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१,७४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,५९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,४९६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,७५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.